मुंबई: विधानसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यानं पश्चिम बंगालमधील राजकारण तापलं आहे. पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशी थेट लढत होणार असल्याचं चित्र दिसत आहे. गेल्या काही महिन्यांपासून अनेक नेत्यांनी तृणमूल सोडून भाजपचं कमळ हाती घेतलं. त्यामुळे तृणमूलच्या सर्वेसर्वा आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमोर आव्हान उभं राहिलं आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेनं एक महत्त्वाची घोषणा केली आहे.बिहारमध्ये शिवसेनेनं विधानसभा निवडणुकीत काही जागा लढवल्या होत्या. त्यामुळे पश्चिम बंगालमध्येही शिवसेना ताकद आजमावून पाहणार का, अशी चर्चा सुरू होती. याबद्दल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केलं आहे. 'शिवसेना बंगालमध्ये निवडणूक लढवणार की नाही, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या चर्चेनंतर याबद्दलची अपडेट मी तुम्हाला देत आहे,' असं राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
पश्चिम बंगालमध्ये एकूण आठ टप्प्यात विधानसभा निवडणूक
>> पहिला टप्पा - २७ मार्च मतदान>> दुसरा टप्पा - १ एप्रिल मतदान>> तिसरा टप्पा - ६ एप्रिल मतदान>> चौथा टप्पा - १० एप्रिल मतदान>> पाचवा टप्पा - १७ एप्रिल मतदान>> सहावा टप्पा- २२ एप्रिल मतदान>> सातवा टप्पा- २६ एप्रिल मतदान>> आठवा टप्पा- २९ एप्रिल मतदान२ मे रोजी जाहीर होणार विधानसभेचा निकाल