नवी दिल्ली :सचिन वाझे (Sachin Vaze) प्रकरणात अखेर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. परमवीर सिंग यांच्या जागी आता हेमंत नगराळे (Hemant Nagrale) हे मुंबई पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार पाहणार आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. या टीकेला शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. हमाम में सब नंगे होते है, असे राऊत यांनी म्हटले आहे. (shiv sena leader sanjay raut replied devendra fadnavis on sachin vaze issue)
भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत सचिन वाझे प्रकरणात ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेनंतर संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कुणाच्या राज्यात कोण वसुली करत होते आणि त्यांचे वसुली इनचार्ज कोण होते, यासंदर्भात किमान राजकारणातील लोकांनी तरी बोलू नये. हमाम में सब नंगे होते है, असा पलटवार करत, परमबीर सिंग यांची बदली हा मुद्दाच नाहीये, असे संजय राऊत यांनी सांगितले.
“१६ वर्षांनी सचिन वाझेंना परत घेताना पोलीस दलाची महान परंपरा धुळीस मिळेल हे लक्षात आलं नाही का?”
सरकारचा केसही कुणी वाकडा करू शकत नाही
ज्या प्रकारचं वातावरण बनलं होतं, त्यावर मुख्यमंत्र्यांना वाटलं की ज्या अधिकाऱ्याबाबत शंका आहे, त्याचा तपास होईपर्यंत बदली व्हायला हवी. विरोधकांना वाटतंय हा खूप मोठा मुद्दा आहे. पण हा मुद्दाच नाहीये. सरकारचा केसही कुणी वाकडा करू शकत नाही. जेव्हा अशा प्रकारच्या गोष्टी समोर येतात, तेव्हा कारवाई करणे हे आमचे कर्तव्य आहे. विरोधकांना याचा मुद्दा बनवायचा असेल, तर तो त्यांनी पुढची साडेतीन वर्ष तो बनवत राहावा, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
आम्ही आमचे कर्तव्य जाणतो
आमचं कर्तव्य आम्ही जाणतो. आणि त्याच कर्तव्याला अनुसरून मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे. तपास एनआयए आणि एटीएस करत आहे. तपास समोर आल्यानंतर त्यावर बोलणे योग्य ठरेल. भाजपच्या कार्यकाळात यापेक्षा भयंकर घटना घडल्या आहेत. आम्ही त्यात कधीच हस्तक्षेप केलेला नाही. तपास करणे तेथील पोलिसांचा अधिकार असतो, असेही राऊत म्हटले आहे.
'अशी' आहे मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झालेल्या हेमंत नगराळे यांची कारकीर्द
काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस
सचिन वाझे हे काहींसाठी वसुली एजंटचे काम करत होते, त्यांचे खरे ऑपरेटर्स कोण आहेत, हे शोधून काढले पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. दरम्यान, सचिन वाझे प्रकरणी परमबीर सिंह यांची उचलबांगणी करण्यात आली आहे. परमबीर सिंग यांच्या जागी आता हेमंत नगराळे हे मुंबई पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार पाहणार आहेत. तर परमबीर सिंह यांच्याकडे गृहरक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे.