प्रकाश बेळगोजीबेळगाव: शिवसेनेचे नेते प्रकाश शिरोळकर यांचा मुलगा प्रतीक याने गळफास घेवून आत्महत्या केली. आर्किटेक्ट असलेल्या प्रतिकचा एका महिन्यापूर्वीच विवाह झाला होता. काल, गुरुवारी रात्री गणेशपुर येथील राहत्या घरी त्याने गळफास घेवून जीवन संपवले. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.मिळालेल्या माहितनुसार घरातील सर्व मंडळी खोलीत असताना प्रतीकने दुसर्या खोलीत गळफास लावून घेतला. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. आज, शुक्रवारी दुपारी कोनवाळ गल्ली येथील राहत्या घरातून त्याची अंत्ययात्रा सदाशिवनगर स्मशान भूमिकेत निघणार आहे. घटनेची माहिती कळताच महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी शिरोळकर कुटुंबीयांचे सांत्वन केले.आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी कॅम्प पोलिसात गुन्हा नोंद झाला असून नेमकी प्रतीकने आत्महत्या का केली याचा तपास सुरू आहे.
बेळगावात शिवसेना नेत्याच्या मुलाची आत्महत्या, नुकताच झाला होता विवाह
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 1:19 PM