Shiv Sena on S Jaishankar: परराष्ट्रमंत्र्यांनी केली अमेरिकेतील पत्रकाराची 'बोलती बंद'; प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, "जबरदस्त..."
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 09:34 PM2022-04-13T21:34:46+5:302022-04-13T21:36:14+5:30
Shiv Sena on S Jaishankar: परराष्ट्रमंत्री एस जयशंकर (S. Jaishankar) यांनी अमेरिकेतील पत्रकरानं विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत त्याची बोलतीच बंद केली.
Shiv Sena on S Jaishankar: परराष्ट्रमंत्री एस जयशंकर (S. Jaishankar) यांनी अमेरिकेतील पत्रकरानं विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत त्याची बोलतीच बंद केली. यानंतर शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्वीट करत जबरदस्त असं म्हटलंय. यापूर्वी शिवसेना आणि भाजप यांची युती होती. परंतु आता त्यांच्यात युती नाही आणि अनेकदा परराष्ट्र धोरणांवरून शिवसेना केंद्रावर निशाणा साधत असते.
एस जयशंकर यांनी दिलेल्या उत्तराची चतुर्वेदी यांनी सोशल मीडियावरून प्रशंरा केली आहे. त्यांनी जयशंकर यांच्या उत्तराचा एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. तसंच परराष्ट्र मंत्र्यांचं जबरदस्त उत्तर असंही त्यांनी लिहिलं आहे.
Superb from EAM!👏🏼👏🏼
— Priyanka Chaturvedi🇮🇳 (@priyankac19) April 12, 2022
“If you're looking at India’s energy purchases from Russia, I'd suggest your attention should be on Europe— our purchases for the month would be less than what Europe purchases in an afternoon” pic.twitter.com/nUuWWWIdps
परराष्ट्र मंत्र्यांनी केली बोलती बंद
परराष्ट्रमंत्र्यांना विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, "तुम्ही रशियाकडून ऊर्जा खरेदीबद्दल बोलत आहात. मी तुम्हाला सल्ला देईन, की तुम्ही युरोपकडे लक्ष द्या. आमच्या ऊर्जा सुरक्षेसाठी आवश्यक तेवढी ऊर्जा खरेदी आम्ही करतो. मात्र, आकडेवारी पाहिल्यास महिनाभरात जेवढे कच्चे तेल रशियाकडून भारत खरेदी करतो, त्यापेक्षा जास्त खरेदी युरोपमध्ये एका दिवसात होते, हे लक्षात येईल."
युक्रेनबाबत भूमिका भारतालाच ठरवावी लागणार
भारताने युक्रेनबाबत मांडलेली भूमिका आणि अतिशय महत्त्वपूर्ण मानवीय मदत केल्याबाबत एंटोनी ब्लिंकन यांनी समाधान व्यक्त केले. युक्रेनमध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या हत्येचा भारताने निषेध करून स्वतंत्र चौकशीची मागणी केली. तसंच भारतानं युक्रेनला औषधांसह इतरही बरीच मानवीय मदत केली आहे. या आव्हानांबाबत काय भूमिका घ्यावी, हे भारतालाच ठरवावं लागणार आहे, असं ब्लिंकन म्हणाले.