शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
5
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
6
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
7
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

“PM मोदी ‘द काश्मीर फाइल्स’चे प्रचारक, भाजपवाले राजकीय अजेंडा राबवतायत”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 12:06 PM

काश्मिरी पंडितांची वेदना देशात बाळासाहेब ठाकरे यांच्या इतकी कुणाला माहीत नसेल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली: गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात नानाविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे दिसत आहे. त्यात आता ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची भर पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी या चित्रपटाची स्तुती केल्यानंतर आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या मुद्द्यावरून केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी द काश्मीर फाइल्स या चित्रपटाचे प्रचारक असून, भाजपवाले राजकीय अजेंडा रावबत असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. 

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट (The Kashmir Files) चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. काश्मिरी पंडितांवर झालेले अत्याचार या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत. मोठ्या संख्येने प्रेक्षक चित्रपटगृहात हजेरी लावत आहेत. अनेक बड्या चित्रपटांना टक्कर देत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींचा गल्ला जमवत आहे. त्यातच भाजपच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चित्रपटावर भाष्य केले. यानंतर यावरून पुन्हा एकदा राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाली आहे. संजय राऊत यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना हल्लाबोल केला आहे. 

PM मोदीच ‘द काश्मीर फाइल्स’चे प्रचारक

द काश्मीर फाइल्स चित्रपटाचे पंतप्रधान मोदी हे सर्वांत मोठे प्रचारक आहेत. हा एक राजकीय अजेंडा राबवला जात आहे. काश्मिरी पंडितांची वेदना देशात बाळासाहेब ठाकरे यांच्या इतकी कुणाला माहीत नसेल, असे सांगत द काश्मीर फाइल्समध्ये अनेक सत्य दडवली आहेत. ताश्कंद फाइल्स चित्रपटात लालबहादूर शास्त्रींच्या मृत्यूचे खापर एका कुटुंबावर फोडण्याचा अजेंडा होता. तसाच अजेंडा काश्मीर फाइल्सचा आहे. महाराष्ट्र सरकारने युती सरकारच्या काळात काश्मिरी मुलांसाठी वैद्यकीय आणि इंजिनिअरिंगमध्ये पाच टक्के जागा राखीव ठेवल्या होत्या. काश्मीरची खरी फाइल बाळासाहेब ठाकरे यांना माहिती आहे. नुसता चित्रपट टॅक्स फ्री करून त्यांच्या वेदना कळत नाहीत, असा खोचक टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे. 

काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी?

द काश्मीर फाइल्ससारखे चित्रपट बनायला हवेत. अशा चित्रपटांतून सत्य जनतेसमोर येत असते. गेल्या अनेक दशकांपासून जे सत्य लपवण्याचा प्रयत्न झाला त्याला समोर आणले जात आहे. त्यामुळे जे लोक सत्य लपवण्याचा प्रयत्न करतायेत ते आज विरोध करत आहेत, असा टोला त्यांनी काँग्रेसला नाव न घेता लगावला.

दरम्यान, संजय राऊत यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यावरही टीकास्त्र सोडले आहे. राज्यपालांकडून ही अपेक्षा नाही. ज्या पक्षातून राज्यपाल आले, त्यांच्या दबावामुळे ते राजकारण करत आहेत. ज्या पातळीवर त्यांच्या पक्षाने आणि राज्यपालांनी हा संघर्ष नेऊन ठेवला आहे इतिहासात त्याची काळ्या अक्षराने नोंद होईल. संविधान भंग करणाऱ्या व्यक्तीला पदावर ठेवणे हे आणिबाणीची आठवण करून देणारे आहे, असे संजय राऊत म्हणाले. 

टॅग्स :PoliticsराजकारणSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाThe Kashmir Filesद काश्मीर फाइल्स