Sanjay Raut in Bharat Jodo Yatra: संजय राऊतांची ‘पवार’फुल खेळी; भरपावसात राहुल गांधींसोबत भारत जोडोची पदयात्रा!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 01:17 PM2023-01-20T13:17:05+5:302023-01-20T13:18:22+5:30

Sanjay Raut in Bharat Jodo Yatra: महाराष्ट्रातही पावसामुळेच सत्तांतर झाले होते. राजकारणात पाऊस आणि वादळे येतच असतात, असे संजय राऊत म्हणाले.

shiv sena thackeray group sanjay raut participate in congress rahul gandhi bharat jodo yatra in jammu kashmir | Sanjay Raut in Bharat Jodo Yatra: संजय राऊतांची ‘पवार’फुल खेळी; भरपावसात राहुल गांधींसोबत भारत जोडोची पदयात्रा!

Sanjay Raut in Bharat Jodo Yatra: संजय राऊतांची ‘पवार’फुल खेळी; भरपावसात राहुल गांधींसोबत भारत जोडोची पदयात्रा!

Next

Sanjay Raut in Bharat Jodo Yatra: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा जम्मू काश्मीरमध्ये पोहोचली आहे. दक्षिण भारतातून सुरू झालेली ही पदयात्रा हजारो किलोमीटरचा प्रवास करून जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचली आहे. भारत जोडो यात्रा ज्या ज्या राज्यांमध्ये गेली, त्या त्या ठिकाणी प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले जात आहे. यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत भारत जोडो यात्रेत सहभागी झाले. यापूर्वीच आपण भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले होते. 

भारत जोडो यात्रेत पुन्हा एकदा राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्यातील जवळीक दिसून आली. राहुल गांधी यांच्या पदयात्रेला सुरुवात झाली तेव्हा जम्मू परिसरात पाऊस पडत होता. संजय राऊत यांनी भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. जम्मूमध्ये ५ अंश सेल्सिअस इतके तापमान आहे. अशातच पदयात्रेच्यावेळी पावसाला सुरुवात झाली. तेव्हा राहुल गांधी यांनी माझ्यासाठी रेनकोटची व्यवस्था केली. ते सुरुवातीला मला त्यांच्यात अंगावरील रेनकोट काढून देत होते. मी नको नको म्हणत असतान त्यांनी गाडीतून दुसरा रेनकोटही मागवला. मात्र, मी पावसात चालायची तयारी दाखवली आणि आम्ही पुढे चालू लागलो. महाराष्ट्रातही पावसामुळेच सत्तांतर झाले होते, असा टोलाही संजय राऊत यांनी यावेळी बोलताना लगावला.

राहुल गांधी यांच्यासोबत पदयात्रेचा पहिला टप्पा पूर्ण केला

राहुल गांधी कडाक्याच्या थंडीत फक्त एका टी-शर्टवर फिरतात, याविषयी संजय राऊत यांना विचारणा करण्यात आली. तेव्हा राऊत यांनी म्हटले की, मी गेल्या अनेक वर्षांपासून राहुल गांधी यांना ओळखतो. मला त्यांची दिनचर्या माहिती आहे, मला त्यांची शारीरिक आणि मानसिक क्षमता माहिती आहे. राहुल गांधीही मला अनेक वर्षांपासून ओळखतात. त्यांनी माझी विचारपूस केली. माझ्या हृदयात सहा स्टेन्स असल्याचे त्यांना माहिती आहे. त्यामुळे मी चालू शकेन की नाही, याबाबत राहुल गांधी यांना शंका होती. परंतु, मी राहुल गांधी यांच्यासोबत पदयात्रेचा पहिला टप्पा पूर्ण केला, असे संजय राऊत यांनी सांगितले. 

दरम्यान, संजय राऊत गळ्यात भगवी मफलर घालून राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेत चालत होते. राहुल गांधी यांनी ७ सप्टेंबर पासून तामिळनाडूच्या कन्याकुमारी येथून भारत जोडो यात्रेला सुरुवात केली होती. मागचे चार महिने कन्याकुमारीपासून दक्षिणेतली राज्य पायी चालत राहुल गांधी उत्तरेत पोहोचले आहेत. येत्या काही दिवसांत भारत जोडो यात्रेची सांगता होणार आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: shiv sena thackeray group sanjay raut participate in congress rahul gandhi bharat jodo yatra in jammu kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.