शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Maharashtra Politics: ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे सादर केली २० लाख प्रतिज्ञापत्रे; शिंदे गटाची सदस्यसंख्या किती?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2022 9:59 PM

Maharashtra News: दोन्ही गटांनी आपणच शिवसेना असल्याचे सिद्ध करण्यासाठी कंबर कसली असून, ही लढाई अधिक तीव्र होऊ शकते, असे सांगितले जात आहे.

Maharashtra Politics: एकीकडे महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद, छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केली जाणारी आक्षेपार्ह विधाने, निवडणुका या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले असताना दुसरीकडे ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आणखी प्रतिज्ञापत्र सादर केल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वी विहीत नमुन्यात प्रतिज्ञापत्र सादर करावेत, असे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला दिले होते. 

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेला मोठे भगदाड पडले. ४० आमदार आणि १२ खासदांचा पाठिंबा मिळाल्यानंतर पक्ष चिन्ह आणि पक्षाचे नाव आपल्याला मिळावे, यासाठी शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. मात्र, यावेळी निवडणूक आयोगाने शिवसेनेचे मूळ नाव आणि पक्ष चिन्ह गोठवून शिंदे गट आणि ठाकरे गटाला नवे नाव आणि चिन्ह दिले. तसेच पक्षाला असलेल्या पाठिंब्याबाबत आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले होते. 

निवडणूक आयोगासमोरील लढाई अधिक तीव्र होण्याचे चित्र

निवडणूक आयोगाने पक्षावरील आपल्या दाव्याच्या समर्थनासाठी कागदपत्रांची मागणी दोन्ही गटांकडे केली होती. पक्षावरील आपला दावा सिद्ध करण्यासाठी शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाने २० लाख प्राथमिक सदस्यांचे प्रतिज्ञापत्र  निवडणूक आयोगासमोर सादर केले. तर, तेवढेच प्राथमिक सदस्यांचे अर्ज दाखल करणार असल्याचा दावा बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोगासमोरील लढाई अधिक तीव्र होणार असल्याचे सांगितले जात आहे. 

शिंदे गटाने नेमकी किती प्रतिज्ञापत्रे सादर केली?

शिंदे गटानेही आपला पक्ष मजबूत करण्यासाठी कंबर कसली आहे. पक्षाचे ४० आमदार आणि १३ खासदारांसोबत शिंदे गटाने आपलाच गट खरी शिवसेना असल्याचा दावा केला आहे. शिंदे गटातील एका नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, शिंदे गटाने आतापर्यंत १० लाख ३० हजारांच्या घरात सदस्यत्व अर्ज आणि प्रतिज्ञापत्र दाखल केले आहेत. त्याशिवाय १.८ लाख पदाधिकाऱ्यांचे अर्ज दाखल करण्यात आले आहेत. शिंदे गटाकडून आणखी १० लाख अर्ज दाखल करण्यात येणार असल्याची माहिती शिंदे गटाच्या नेत्यांनी दिली.

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाने आपल्या गटात असलेल्या सदस्यांचे २० लाखांहून अधिक अर्ज-प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाकडे जमा केले असल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. त्याशिवाय, आम्ही तीन लाख पदाधिकाऱ्यांचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहेत. यामध्ये जिल्हा प्रमुखांपासून ते गटप्रमुखांचा समावेश आहे. त्याशिवाय इतरही काही कागदपत्रे सादर केली असल्याचे देसाई यांनी सांगितले. ऑक्टोबर महिन्यात शिवसेना ठाकरे गटाने जवळपास ८.५ लाख प्राथमिक सदस्यांचे प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगात दाखल केले होते. हे प्रतिज्ञापत्र दोन ट्रक भरून आणले गेले होते. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे