संभलच्या नखासा चौकात शनिवारी वीजचोरीच्या प्रकरणाचा तपास वीज विभाग आणि प्रशासनाचे पथक करत होते. दरम्यान, नखासा पोलीस ठाणे हद्दीतील मोहल्ला खग्गु सराई येथे ४६ वर्षांपासून बंद असलेले शिव मंदिर सापडले. प्रशासनाने हे मंदिर पुन्हा खुले केले आहे. अवैध अतिक्रमण आणि वीजचोरीविरोधात डीएम आणि एसपींच्या संयुक्त छाप्यात हे मंदिर सापडले.
हुंडा, मारहाण आणि...", निकिता सिंघानियाने जौनपूरमध्ये अतुल सुभाषवर ५ केसेस दाखल केल्या होत्या
एका स्थानिक नागरिकाने दिलेली माहिती अशी, हे मंदिर १९७८ पासून बंद होते. मंदिर पाहिल्यानंतर पोलिसांनी शिवलिंगाची स्वच्छता केली. सपा खासदार झिया उर रहमान बर्के यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर हे मंदिर आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून संभलमधील वातावरण तणावपूर्ण आहे. काही दिवसांपूर्वी न्यायालयाच्या आदेशावरून एक पथक तेथे पाहणी करण्यासाठी पोहोचले असता त्याच्या निषेधार्थ हिंसाचार झाला आणि या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला. नईम गाझी, बिलाल अन्सारी, अयान अब्बासी आणि कैफ अल्वी अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. याशिवाय अनेक लोक जखमी झाले आहेत.
नगर हिंदू सभेचे संरक्षक विष्णू शरण रस्तोगी यांनी वृत्तसंस्था एएनआयला सांगितले की, “आम्ही खग्गु सराय भागात राहत होतो. आमच्या जवळच एक घर आहे, 1978 नंतर आम्ही घर विकले आणि जागा रिकामी केली. हे भगवान शिवाचे मंदिर आहे. आम्ही हा परिसर सोडला आणि आम्हाला या मंदिराची काळजी घेता आली नाही. या ठिकाणी एकही पुजारी राहत नाही. 15-20 कुटुंबांनी हा परिसर सोडला. पुजारी इथे राहू शकत नसल्याने आम्ही मंदिर बंद केले होते. पुजाऱ्याची येथे राहण्याची हिंमत नव्हती. हे मंदिर 1978 पासून बंद होते आणि आज ते उघडले आहे.” विष्णू शरण रस्तोगी यांनी सांगितले की, त्यांच्या पुतण्याने या मंदिराला कुलूप लावले होते. पोलिसांच्या मेहरबानीमुळे हे मंदिर खुले असल्याचे त्यांनी सांगितले.
विष्णू शरण रस्तोगी म्हणाले की, 1978 मध्ये वाद झाल्यानंतर लोक येथून निघून गेले होते.
मंदिरात हनुमान, शिवलिंग, नंदी आणि कार्तिकेयच्या मूर्तीही आहेत. या भागातील अतिक्रमणामुळे मंदिराचा ताबा घेण्यात आला मात्र आता पोलीस प्रशासनाने या अतिक्रमणावर कडक कारवाई करत या जागेवर बुलडोझर फिरवला आणि त्यानंतर या मंदिराचा शोध लागला. मंदिराजवळ एक विहीर आणि पिंपळाचे झाडही होते.
संभलच्या एसडीएम वंदना सिंह यांनी सांगितले की, वीजचोरीविरोधात मोहीम राबवली जात असताना प्रशासनाचे पथक शनिवारी सकाळी येथे पोहोचले. त्यादरम्यान हे मंदिर प्रकाशात आले. यानंतर डीएमला कळवण्यात आले आणि मंदिराचे कुलूप उघडण्यात आले.