नवी दिल्ली, दि. 17 - ''देशातील सर्व मुस्लिम आज दहशतीखाली आहेत. मुस्लिमांमध्ये भीतीची भावना आहे'', असे विधान माजी मंत्री आणि सपाचे आमदार शिवपाल यादव यांनी केले आहे. शिवाय, आज सर्वाधिक दुःखी शेतकरी, व्यापारी आणि मुस्लिम आहेत, असेही ते म्हणालेत. यावेळी त्यांनी गोरखपूरमधील बालमृत्यू प्रकरणाविरोधातही कारवाई करण्याचीही मागणी केली. गोरखपूर बालमृत्यू प्रकरण म्हणजे भाजपा सरकारचे मोठे अपयश आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्यानंतरही कुणीही याची जबाबदारी स्वीकारत नाही. राज्यातील जनतेनं प्रचंड अपेक्षांपोटी भाजपाचे सरकार सत्तेत आणले होते,मात्र समाजातील कोणत्याही वर्गाला फायदा मिळत नाहीय. सुरुवातीला नोटाबंदी आणि त्यानंतर आता जीएसटीमुळे व्यापा-यांचे कंबरडं मोडले आहे. शेतक-यांचीही वाईट अवस्था आहे, असे सांगत शिवपाल यादव यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
वाचा आणखी बातम्या (गोरखपूर बालमृत्यू प्रकरण : ऑक्सिजन पुरवठा कधी रोखला नव्हताच, कंपनीचा दावा)(केरळमध्ये सरसंघचालकांना ध्वजरोहणापासून रोखणा-या जिल्हाधिका-याची बदली)(पंतप्रधानांच्या भाषणावर टीका करावी इतके राहुल गांधी सक्षम नाहीत - भाजपा)
गोरखपूर बालमृत्यू प्रकरण उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील बाबा राघवदास मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्सिजन पुरवठ्या अभावी झालेल्या 65 हून अधिक मुलांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणासंदर्भात ऑक्सिजनचा पुरवठा करणारी कंपनी पुष्पा सेल्स प्रायव्हेट लिमिटेडदेखील वादाच्या भोव-यात अडकली आहे. मात्र, हॉस्पिटलकडे 69 लाख रुपये थकीत असताना ऑक्सिजनचा पुरवठा कधीही थांबवण्यात आला नव्हता, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. बाबा राघवदास मेडिकल कॉलेजमधील ही दुर्घटना आहे. बालमृत्यूप्रकरणावर कंपनीनं आपलं मौन सोडत सांगितलं की, कंपनीकडून कधीही ऑक्सिजन पुरवठ्यावर रोख लावण्यात आलेली नव्हती. पुष्पा सेल्स प्रायव्हेट लिमिटेडनं स्पष्टीकरण देताना असे सांगितले की, पुष्पा सेल्सचे थकीत बिल न भरल्यानंतरही बीआरडी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा सुरूच होता. या महिन्यातील पहिला पुरवठा 4 ऑगस्ट रोजी करण्यात आला होता. यानंतर 12 ऑगस्ट रोजी पुन्हा पुरवठा करण्यात आला. 30 जुलै रोजी हॉस्पिटलला नोटीस बजावून थकबाकी 15 दिवसांत भरण्यास सांगण्यात आले होते. मात्र असे असताना ऑक्सिजनचा पुरवठा रोखण्यात आलेला नव्हता.
अमित शाहांचे बेताल वक्तव्यएकीकडे देशभरात उत्तर प्रदेशातील गोरखपूर बालमृत्यूकांडवरुन रोष व्यक्त होत असताना भाजपाध्यक्ष अमित शाहा यांनी अत्यंत बेताल वक्तव्य केले. 'इतक्या मोठ्या देशात खूप सा-या दुर्घटना झाल्या आहेत. पहिल्यांदा अशी दुर्घटना झालेली नाही', असं धक्कादायक वक्तव्य अमित शाहा यांनी केले.