काँग्रेसने उडवली शिवराजसिंह चौहानांची खिल्ली, 'आयड्रॉप्स, बदाम अन चव्यनप्राश गिफ्ट'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 08:26 PM2019-05-08T20:26:18+5:302019-05-08T20:28:13+5:30
माजी केंद्रीय मंत्री सुरेश पचौरी आणि मध्य प्रदेशमधील मंत्री पीसी शर्मा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शिवराज चौहान यांची भेट घेतली होती.
भोपाळ - मध्य प्रदेश सरकारकडून देण्यात आलेल्या शेतकरी कर्जमाफीवरुन भाजपानेकाँग्रेसवर टीका केली. शेतकरी कर्जमाफी निव्वळ धूळफेक असल्याचा आरोप भाजपाकडून वारंवार काँग्रेसवर केला जात होता. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी अनोखी शक्कल लढवत थेट मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज चौहान यांचे घर गाठले होते.
माजी केंद्रीय मंत्री सुरेश पचौरी आणि मध्य प्रदेशमधील मंत्री पीसी शर्मा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शिवराज चौहान यांची भेट घेतली होती. या भेटीमध्ये शिष्टमंडळाने कर्जमाफी केल्याचे पुरावे म्हणून दस्तावेज दिले. तब्बल एक गाडी भरुन हे दस्तावेज शिवराज चौहान यांच्या घरी आणून त्यांच्यासमोर ही सगळी कागदपत्रे ठेवण्यात आली. शिवराज चौहान यांना देण्यात आलेली सर्व कागदपत्रे हे शेतकरी कर्जमाफीचे पुरावे आहेत. त्यामध्ये शेतकऱ्यांची नावे, त्यांचे मोबाईल नंबर, कर्जमाफीचं प्रमाणपत्र, कोणत्या बँकेचे कर्ज घेतले यासह संपूर्ण माहिती देण्यात आल्याचा दावा काँग्रेस नेत्यांकडून करण्यात आला. त्यानंतर आता पुन्हा एकदा काँग्रेसने चौहान यांची खिल्ली उडविण्याचा प्रयत्न केला आहे.
काँग्रेस कार्यकर्त्यांनी बुधवारी पुन्हा एकदा शिवराजसिंह चौहान यांना कर्जमाफी झाल्याची आठवण करून दिली. त्यासाठी, काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिवराजसिंह चौहान यांना डोळ्यात सोडायचं औषध म्हणजे आयड्रॉप, चव्यनप्राश आणि बदाम पाठवले आहेत. त्यासोबतच, शिवराजसिंह यांची नजर आणि बुद्धमत्ता कमी झाली आहे. त्यामुळे त्यांना हे सर्व सामान पाठविण्यात येत असल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, शिवराजसिंह यांनी राज्यातील कर्जमाफी फसवी असल्याचे सांगत, शेतकऱ्यांचे कर्ज माफ झालेच नसल्याचे म्हटले होते.
Bhopal: MP Congress workers are sending eye-drops, 'chyawanprash' & almonds to ex-CM SS Chouhan. Say, "He lies about farm loan waiver & state govt's others decisions. We wanted him to know the reality but it seems his eyesight&memory has weakened. We're sending this to cure him." pic.twitter.com/MkbjByYKv6
— ANI (@ANI) May 8, 2019