पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण तथा ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली एका मॉनिटरिंग समूहाची स्थापना केली आहे. हा समूह अथवा ग्रूप पंतप्रधानांनी घोषित केलेल्या योजना तसेच, केंद्रीय बजेट आणि प्रकल्पांच्या अंमलबजावणीची समीक्षा करेल.
या मॉनिटरिंग ग्रुपची पहिली बैठक 18 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान कार्यालयात (पीएमओ) पार पडली. या बैठकीला रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांसह भारत सरकारचे सर्व सचिव हायब्रिड मोडमध्ये उपस्थित होते. शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली साउथ ब्लॉकमध्ये असलेल्या पीएमओमध्ये दर महिन्याला मॉनिटरिंग ग्रुपची बैठक होईल. या बैठकीत सर्व सरकारी योजनांचा आढावा घेतला जाईल आणि त्याची अंमलबजावणी केली जाईल.
शिवराजसिंह चौहानांचे असेल लक्ष -बैठकीला उपस्थित असेलेल्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या एनडीए सरकारपासून घोषित करण्यात आलेल्या योजनांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी शिवराज सिंह चौहान यांच्याकडे देण्यात आली आहे. हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधानांनी घोषित केलेल्या विविध योजनांसाठी जे नोडल अधिकारी म्हणून कार्यरत आहेत, त्यांनाही या बैठकीत सहभागी होण्यास सांगण्यात आले आहे.
या प्रकल्पांवर असेल लक्ष -या मॉनिटरिंग ग्रुपसंदर्भात सरकारने अद्याप कुठल्याही प्रकारचे अधिकृत वक्तव्य केलेले नाही. मात्र, प्रधानमंत्री पोर्टलवरील प्रत्येक योजनेवर शिवराज सिंह चौहान यांचे लक्ष असेल. या शिवाय ज्या योजना पिछाडीवर आहेत अथवा मागे पडत आहेत, त्यांसदर्भातही सचिव शिवराज सिंह चौहान यांना माहिती देतील. याशिवाय, या योजना सुरळित करण्यासाठी आणखी काय केले जाऊ शकते? यावरही विचा केला जाईल.