भोपाळ : कोरोनाच्या संकटकाळात एकच व्यक्ती मध्यप्रदेशचा गाडा हाकत असल्याची टीका होत असतानाच लॉकडाऊनमध्ये शिवराजसिंहांनी मंत्रिमंडळ विस्तार करत विरोधकांना धक्का दिला आहे. मात्र, यावेळी राज्याची पुन्हा सत्ता देणाऱ्या शिंदे यांना झुकते माप देण्यात आले आहे.
ज्योतिरादित्य शिंदे यांनी बंड करत काँग्रेसचे कमलनाथ सरकार पाडले होते. यामुळे शिवराज सिंह चौहान पुन्हा मुख्यमंत्रीपदी बसले होते. २३ मार्चला त्यांनी शपथ घेतली होती. मात्र, देशावर कोरोनाचे संकट उभे ठाकलेले असल्याने त्यांनी मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर टाकला होता. राज्यातील विरोधकांनी टीका सुरु केल्यावर आज शिवराज सिंह यांनी मंत्रिमंडळ विस्तार केला आहे. आज पाच जणांना शपथ देण्यात आली. यामध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांच्या गटातील दोघांचा समावेश आहे.
राज्यपाल लालजी टंडन यांनी मंत्र्यांना शपथ दिली. लॉकडाऊन हटल्यानंतर पुढील महिन्यात मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार आहे. दिल्लीवरून सोमवारी संमती मिळाली. यानंतर शिवराज सिंह चौहान यांनी राज्यपाल लालजी टंडन यांच्याशी चर्चा केली. आज नरोत्तम मिश्रा यांनी पहिली शपथ घेतली. त्यांनतर शिंदे समर्थक तुलसी सिलावट यांनी शपथ घेतली. सिलावट हे कमलनाथ सरकारमध्येही आरोग्य मंत्री होते. यानंतर भाजपाचे आमदार कमल पटेल यांनी शपथ घेतली. ते उमा भारती यांचे जवळचे आहेत.
चौथ्या क्रमांकावर गोविंद सिंह राजपूत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. बंडखोर आमदारांमध्ये यांचा समावेश होता. पाचव्या क्रमांकावर मीना सिंह यांनी शपथ घेतली.
आणखी वाचा...
'मी इंजिनिअरिंग सोडून आर्किटेक्ट बनलो, पण...'; रतन टाटांच्या मनावर आजही मोठे ओझे
कच्च्या तेलाची किंमत १ डॉलरपेक्षा खाली गेली खरी; पण भारताला फायदा काय?
'उद्धव ठाकरे सरकार होरपळून राख होईल'; उमा भारती संतांच्या हत्येवरून संतापल्या
योगी आदित्यनाथांच्या मावशीला सीमेवर रोखले; जिल्हाधिकाऱ्यांचा पासही होता
किम जोंग उन अत्यवस्थ?; हृदयविकारावरील शस्त्रक्रियेमुळे जिवाला धोका