मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर, RJD नेते मृत्युंजय तिवारी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. तिवारी म्हणाले, हे कुठल्याही प्रकारचे कास्ट बॅलेन्स नाही. ही मोदीशाहीची पराकाष्टा आहे. एवढेच नाही तर, "आज ज्या पद्धतीने शिवराज सिंह चौहान, वसुंधरा राजे आणि रमन सिंह यांच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत, ही तर येणाऱ्या वादळापूर्वीची शांतता आहे," असेही तिवारी यांनी म्हटले आहे.
'भाजपमध्ये मोठं वादळ दिसेल' -मृत्युंजय तिवारी म्हणाले, यांची राज्यांनाही रिमोटच्या सहाय्याने चालवण्याची इच्छा आहे. आपापल्या राज्यातील ज्येष्ठ नेत्यांसोबत कशा पद्धतीने व्यवहार केला गेला, हे सर्वांनी बघितले आहे. वरून आलेल्या आदेशानुसार, जबरदस्तीने निर्णय थोपवण्यात आला आहे. यामुळे, येणाऱ्या काही दिवसांत भाजपमधील वादळ दिसून येईल."
राजद नेते तिवारी म्हणाले, खुद्द भाजपमधील नते म्हणत आहेत की, ही मोदीशाही सुरू आहे. तेथूनच सर्व निर्णय घेतले जात आहेत. आता याचे नुकसान भाजपला 2024 मध्ये भोगावे लागेल.