चौकशी करून कलम वगळणार शिवसेनेने फोडला पोलिसांना घाम : कार्यकारी संचालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
By admin | Published: January 14, 2016 11:59 PM
जळगाव: जिल्हा बॅँकेतील गोंधळप्रकरणी शेतकर्यांवर दाखल गुन्ातील ३९५ व ३९३ हे कलम चौकशी करुन वगळण्यासह शेतकर्यांना अटक न करण्याचे आश्वासन पोलिसांनी शिवसेनेच्या मार्चेकरांना दिले. दरम्यान, चौकशी करुन कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांच्यावर ॲट्रासिटीची गुन्हा दाखल करण्याचेही आश्वासन यावेळी देण्यात आले. केळी पीक विम्याच्या रकमेबाबत जिल्हा बॅँकेत जाब विचारण्यासाठी गेलेल्या शेतकर्यांवर बॅँकेच्या अधिकार्यांनी गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ गुरुवारी आमदार गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्यावितिने जिल्हा पेठ पोलीस स्टेशनवर मोर्चा काढण्यात आला. या भव्य मोर्चाने पोलिसांना कमालीचा घाम फोडला होता.
जळगाव: जिल्हा बॅँकेतील गोंधळप्रकरणी शेतकर्यांवर दाखल गुन्ातील ३९५ व ३९३ हे कलम चौकशी करुन वगळण्यासह शेतकर्यांना अटक न करण्याचे आश्वासन पोलिसांनी शिवसेनेच्या मार्चेकरांना दिले. दरम्यान, चौकशी करुन कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांच्यावर ॲट्रासिटीची गुन्हा दाखल करण्याचेही आश्वासन यावेळी देण्यात आले. केळी पीक विम्याच्या रकमेबाबत जिल्हा बॅँकेत जाब विचारण्यासाठी गेलेल्या शेतकर्यांवर बॅँकेच्या अधिकार्यांनी गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ गुरुवारी आमदार गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्यावितिने जिल्हा पेठ पोलीस स्टेशनवर मोर्चा काढण्यात आला. या भव्य मोर्चाने पोलिसांना कमालीचा घाम फोडला होता. घोषणाबाजी करत मोर्चा पोलीस ठाण्यातपोलिसांचा धिक्कार असो...,बॅँक नाही कोणाच्या बापाची..,न्याय द्या.. न्या द्या.., अटक करा..अटक करा..अशा घोषणा देत आमदार गुलाबराव पाटील, उपजिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, माजी महानगर प्रमुख गजानन मालपुरे, लकी टेलर, जि.प.च्या माजी सदस्या महानंदा पाटील, रमेश पाटील, अनिल भोळे, मंगला बारी, शोभा चौधरी यांच्यासह शिवसैनिक व तीनशेच्यावर शेतकरी दुपारी साडे बारा वाजता जिल्हा पेठ पोलीस स्टेशनवर धडकले. गर्दी व मार्चेकरांचा संताप पाहता पोलिसांना घाम फुटला होता. तातडीने अतिरिक्त बंदोबस्त मागविण्यात आला होता. प्रवेशद्वारावरच मोर्चेकरांना अडविण्यात आले. राजकीय दबावाखाली गुन्हेप्रकरणाची चौकशी न करता पोलिसांनी राजकीय दबावाखाली गुन्हे दाखल केल्याचा आरोप गुलाबराव पाटील यांनी केला. यामागे कोण आहे, ते सांगायची गरज नाही, पॉलिहाऊसचे अनुदान खाणारे, वाळूवाल्यांचे बाप कोण आहेत हे सर्वांना माहित आहे, परंतु पोलिसांनी कोणाचे किती ऐकावे यालाही मर्यादा आहेत. मी आमदार असलो तरी चुकीचे सांगत असेल तर माझेही ऐकू नका असे सांगून एकतर्फी कारवाईचा त्यांना निषेध केला.चौकशी करणे पाप आहे का?केळीच्या पीक विम्याचे पैसे मिळत नसल्याने शेतकरी तेथे चौकशी करायला गेले त्यात काय चुकले.चौकशी करणे पाप आहे का? असा सवाल करीत कार्यकारी संचालकानी १४ कोटी रुपये दाबून ठेवले होते, या शेतकर्यांमुळेच ते पैसे वाटप झाले असेही गुलाबराव म्हणाले. या प्रकरणाच्या स्पष्टीकरणासाठी कार्यकारी संचालक व पोलीस अधीक्षक यांना आताच पोलीस स्टेशनला बोलवा असा आग्रह यावेळी आमदारांनी धरला