शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
3
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
4
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
5
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
6
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
7
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
8
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
9
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
10
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
11
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
12
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
13
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
14
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
15
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
16
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
17
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
18
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
19
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
20
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका

शिवसेनेची भूमिका निर्णायक (पदवीधर विश्लेषण) पदवीधर निवडणूक : कॉँग्रेसच्या पथ्यावर; भाजपाला मारक

By admin | Published: January 31, 2017 2:06 AM

प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यावर येऊन ठेपलेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या तोंडावर राज्यात शिवसेनेने भाजपाशी युती तोडण्याची केलेल्या घोषणेमुळे या निवडणुकीची सारी राजकीय गणितं बदलण्याची शक्यता निर्माण झाली असून, शिवसेनेने भाजपाला मदत न करण्याचे जाहीर करून मग कोणाच्या बाजूने कौल देणार हे गुलदस्त्यात ठेवल्यामुळे ज्याप्रमाणे कॉँग्रेस उत्साहित झाली आहे, अगदी त्याच धर्तीवर राष्ट्रवादी कॉँग्रेसने शेवटच्या टप्प्यात प्रचारातून अंग काढून घेतल्याने भाजपालाही हायसे वाटले आहे. त्यामुळे नेहमीपेक्षा काहीशा वेगळ्या वळणावर पोहोचलेल्या या निवडणुकीने अखेरच्या क्षणी उत्कंठा वाढविली आहे.

प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यावर येऊन ठेपलेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या तोंडावर राज्यात शिवसेनेने भाजपाशी युती तोडण्याची केलेल्या घोषणेमुळे या निवडणुकीची सारी राजकीय गणितं बदलण्याची शक्यता निर्माण झाली असून, शिवसेनेने भाजपाला मदत न करण्याचे जाहीर करून मग कोणाच्या बाजूने कौल देणार हे गुलदस्त्यात ठेवल्यामुळे ज्याप्रमाणे कॉँग्रेस उत्साहित झाली आहे, अगदी त्याच धर्तीवर राष्ट्रवादी कॉँग्रेसने शेवटच्या टप्प्यात प्रचारातून अंग काढून घेतल्याने भाजपालाही हायसे वाटले आहे. त्यामुळे नेहमीपेक्षा काहीशा वेगळ्या वळणावर पोहोचलेल्या या निवडणुकीने अखेरच्या क्षणी उत्कंठा वाढविली आहे.
पदवीधर मग ते कोणत्याही क्षेत्रातील असो, त्यांच्या प्रश्नांना विधीमंडळात मांडून शासनाकडून अपेक्षित असलेले निर्णय पदरात पाडून घेण्यासाठी या मतदारसंघाला प्रतिनिधित्व देण्यात आलेले आहे. पारंपरिकपणे भाजपाच्या ताब्यात असलेल्या हा मतदारसंघ सात वर्षांपूर्वी कॉँग्रेसने आपल्याकडे खेचून घेत डॉ. सुधीर तांबे यांच्या ताब्यात दिला असून, आत्ताही निवडणुकीच्या रिंगणात शिक्षक लोकशाही आघाडीच्या पाठिंब्यावर कॉँग्रेसकडून तांबे हेच रिंगणात आहेत, तर भाजपाने गेल्या दोन निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी डॉ. प्रशांत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. वरकरणी या दोन्ही पक्षांमध्येच ही लढत दिसत असली तरी अन्य राजकीय पक्षांचीही भूमिका तितकीच महत्त्वाची आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राज्यात कॉँग्रेस व राष्ट्रवादीने आघाडी केल्यामुळे डॉ. तांबे यांच्या पाठीशी राष्ट्रवादी पूर्ण ताकदीने उभी राहण्याची व्यक्त केलेली अपेक्षा फोल ठरली आहे. त्यामागच्या अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीत कॉँग्रेसने आघाडी करण्यासाठी चालविलेली टाळटाळ हे होय. त्यामुळे राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते अंग मोडून प्रचारात सहभागी झालेले दिसत नाहीत, त्यामागे आणखी दुसरे कारण म्हणजे तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्याकडून अद्याप कार्यकर्त्यांना निरोप आलेला नाही. या दोन्ही बाबी डॉ. तांबे यांच्या अडचणी वाढविणार्‍या व भाजपाला उत्साहित करणार्‍या असल्या तरी, शिवसेनेने भाजपाबरोबर तोडलेल्या युतीमुळे कॉँग्रेसला हायसे वाटणे स्वाभाविक आहे. सेना-भाजपात सध्या असलेले वैर पाहता, भाजपाच्या पराभवासाठी सैनिक त्वेषाने पेटून उठतील अशीच रणनिती कॉँग्रेसने आखली आहे. त्यामुळे शिवसेनेची भूमिका जशी भाजपासाठी महत्त्वाची आहे, तशीच ती कॉँग्रेससाठीही तितकीच आशादायी आहे.
या निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असून, दोन्ही पक्षांनी मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असल्याचे दावे करून स्वत:ची समजूत काढण्याचा प्रयत्न चालविला असला तरी, निवडणुकीच्या रिंगणात तिसर्‍या आघाडीचे कॉ. प्रकाश देसले यांनीदेखील कॉँग्रेस व भाजपापुढे पर्याय उभा केलेला आहे. त्यामुळे या निवडणुकीत एरव्ही राजकीय मुद्द्याला फारसे महत्त्व देण्यात आलेले नाही, यंदा मात्र राजकीय मुद्द्यावरच ही निवडणूक लढविली जात आहे. पदवीधरांचे प्रश्न अनेक आहेत, त्याची चर्चा या प्रचारात झाली नाही, फक्त शिक्षक हाच एकमेव पदवीधर असल्याच्या समजातून फक्त शैक्षणिक संस्थांवरच सार्‍यांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे कोणत्या संस्थावर कोणाचे वर्चस्व आहे त्यावरच निवडणुकीचे गणितं मांडले जात आहेत. या निवडणुकीच्या माध्यमातूनच भविष्यातील शिक्षक मतदारसंघाचेही भवितव्य अजमाविले जाणार असल्याने राजकीय पक्षांनी त्या दृष्टीने या निवडणुकीकडे पाहण्यास सुरुवात केली आहे. घोडा मैदान जवळच असून, केंद्रात व राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपाला मतदार अनुकूलता दर्शवितात की, सरकारवरील नाराजीतून कॉँग्रेसला जवळ करतात हे लवकरच स्पष्ट होणार आहे.