नवी दिल्ली, दि. 22 - शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज राजधानी दिल्लीत भेट झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरूनी भेटीची छायाचित्रे शेअर करून ही माहिती दिली. बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवचरित्र आणि शिवाजी महाराजांसाठी आपले जीवन समर्पित केले आहे. वयाच्या 96 व्या वर्षीही ते शिवचरित्राच्या प्रसारासाठी कार्य करत आहेत. भेटीची छायाचित्रे शेअर करताना मोदींनी पुरंदरेंच्या कार्याची प्रशंसा केली आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची आज भेट झाली. मी गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना ओळखतो. तसेच त्यांचा आदर करतो, असे मोदींनी म्हटले आहे. या भेटीवेळी पुरंदरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठा सरदार वापरत तशी जरीची पगडी आणि उपरणे देऊन त्यांचा सन्मान केला. बाबासाहेब पुरंदरे हे शिवाजी महाराजांचे चरित्र पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करत आहेत. असेही मोदींनी म्हटले आहे.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत झाली भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2017 10:42 PM