नवी दिल्ली -पाकिस्तानात कोरोना व्हायरस वेगावे फैलावत चालला आहे. तेथे आतापर्यंत तब्बल 799 जणांना कोरोनाची लागण झाली तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने चिंता व्यक्त केली आहे.
शोएब म्हणाला, या घातक व्हायरसने एवढे गंभीर रूप धारण केले असतानाही येथील लोग सावध झालेले नाहीत. ते बिनधास्त आणि एकत्रितपणे रसत्यांवर फिरताना दिसत आहेत. त्यांनी स्वतःला लॉकडाउन करून घ्यायला हवे.
कोरोना व्हायरसच्यासंदर्भात आपण भारताकडून काही शिकायला हवे. येथील लोकांनी स्वतःला स्वतःच्या मर्जीने लॉकडाउन करून घेतले आहे. बांगलादेश आणि रवांडासारखे देशही या घातक व्हायरसचा सामना करण्यासाठी चांगल्या उपाय योजना आखत आहेत. मात्र, पाकिस्तानातील लोकांमध्ये भीतीच दिसत नाही. येथे एका-एका बाईकवर चार-चार लोक फिकताना दिसत आहेत. एवढेच नाही, तर लोक पाहाडांवर पिकनिकसाठीही जात आहेत.
या परिस्थितीवर ताबा मिळवण्यासाठी पंजाब (पाकिस्तान प्रांत) सरकारने कर्फ्यूची घोषणा करायला हवी. येथे रात्री 10-10 वाजेपर्यंत हॉटेल्स सुरू आहेत. लोक एकमेकांच्या घरी जेवनासाठी जात आहेत. लोकांनी ही वेळ समजून घ्यावी आणि या व्हायरसचा प्रभाव कमी करण्यासठी, दोन आठवडे गाठी-भेटी टाळाव्यात, असे शोएब अख्तरने म्हटले आहे.
90 टक्के लोकांना केवळ संपर्कात आल्यानेच कोरोना झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लोकांनी एकमेकांच्या संपर्कात येऊ नये आणि दोन आठवडे घरातच थांबावे, असे आवाहनही शोएब अख्तरने पाकिस्तानी जनतेला केली आहे.