कन्नड अभिनेता चिरंजीवी सरजा याचे वयाच्या 39 व्या वर्षी सोमवारी निधन झाले. देशभरातील अनेक सेलिब्रेटींनी सोशल मीडियावरून चिरंजीवी याला श्रद्धांजली वाहिली. प्रसिद्ध भारतीय लेखिका शोभा डे यांनीही सोशल मीडियावरून शोक व्यक्त केला. पण, त्यांना त्या ट्विटवर नेटिझन्सच्या रागाचा सामना करावा लागला. नेमकं असं काय घडलं?
शोभा डे यांनी शोक व्यक्त करताना चिरंजीवी सरजाच्या जागी तेलुगू सुपरस्टार चिरंजीवी कोनिडेला याचा फोटो वापरला आणि श्रद्धांजली वाहिली. पण, अवघ्या काही मिनिटांत चूक लक्षात येताच त्यांनी ते ट्विट डिलीट केलं. तरीही काही नेटिझन्सनी स्क्रीन शॉट काढून शोभ डे यांना ट्रोल केले. शोभा डे यांनी लिहिले होते की,''आणखी एक दिग्गज अभिनेता हरपला. त्याला श्रंद्धांजली वाहताना, त्याच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त करते.''
त्यानंतर नेटिझन्सनी त्यांना ट्रोल केले. एकाने लिहिले की,''प्रिय बॉलिवूड सेलिब्रेटी/ तुम्ही कोणी आहात त्या. तुम्हाला जर आमच्या अभिनेत्याबद्दल माहित नसेल, तर कृपया ट्विट करू नका. तुमचा मुर्खपणा गुगल सर्चवरही शोधून सापडत आहे.'' काहींनी शोभा डे यांना माफी मागण्यास सांगितले.
चिरंजीवी यांनी २००९ मध्ये वायूपुत्र या चित्रपटाद्वारे त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यांनी २२ कन्नड चित्रपटांमध्ये काम केले होते. यातील अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले होते.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
MS Dhoniच्या ट्रॅक्टर खरेदीवर आनंद महिंद्रा म्हणतात...; व्हायरल होतोय ट्विट
Photo : हार्दिक पांड्याचं वडोदरातील लय भारी पेंटहाऊस; नजर हटणारच नाही!
Video : बॉलिवूड सेलिब्रेटींनंतर डेव्हिड वॉर्नर बनला 'या' डान्सरचा जबरा फॅन; तुम्हीही पडाल प्रेमात
न्यूड फोटोनंतर मोहम्मद शमीच्या पत्नीनं शेअर केला पार्टीतला Video; ट्रोलर्संना सुनावले खडे बोल!
OMG : लॉकडाऊनमध्ये अडकलेले पाळीव कुत्रे 'Private Jet' ने मुंबईला येणार, बघा खर्च किती होणार!
धक्कादायक; Racing Carमध्ये इतिहास घडवणारी महिला रेसर बनली 'Porn Star', अन्...