भारतात कमी काळात सर्वात मोठी कंपनी बनलेलेली चीनच्या Xiaomi ने बहिष्काराच्या मोहिमेचा मोठा धसकाच घेतला आहे. इतर कंपन्यांपेक्षा शाओमीच जास्त भारतीय कंपनी असल्याचा दावा कंपनीचे भारतातील सीईओ करू लागले आहेत. मात्र, तरीही भीती कमी होत नसल्याने अखेर देशभरातील स्टोअर्सवरील शाओमीचे लोगो झाकण्याचा निर्णय घेतला आहे.
चीनने गेल्या आठवड्यात भारतीय जवानांवर भ्याड हल्ला केला. यामध्ये 20 जवान शहीद झाले. चीनच्या या विश्वासघातामुळे सीमेवर युद्धजन्य परिस्थती असून चीन विविध भागांमध्ये कुरापती काढू लागला आहे. एकीकडे शांतता चर्चा सुरु ठेवायची आणि दुसरीकडे सैन्य फौजफाटा वाढवायचा अशी चीनची चाल आहे. यामुळे भारतीयांमध्ये कमालीचा आक्रोश दिसून येत आहे.
चीनची शाओमीने भारतात चांगलेच पाय पसरले आहेत. सध्यातरी भारतीय कंपन्यांचा या चीनच्या स्मार्टफोन कंपन्यांना कोणताच पर्याय उपलब्ध नाहीय. तरीही चीनविरोधातील आंदोलन तीव्र झाल्यास त्याचा फटका भारतातील कर्मचारी आणि विक्री स्टोअरना बसू शकतो. तोडफोड, दगडफेक होण्याची शक्यता असल्याने शाओमीने या स्टोअरवरील लोगो झाकण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या शोरुममध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही कंपनीचा युनिफॉर्म न घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
धक्कादायक म्हणजे चीनची कंपनी Xiaomi चा लोगो 'Made in India' च्या मागे लपवत आहे. ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशनने सर्व चिनी स्मार्टफोन कंपन्यांना पत्र पाठवून त्यांची दुकाने आणि उत्पादनावरून मिळणाऱ्या धमक्यांमुळे त्यांच्या कंपनीचे नाव एकतर लपवावे किंवा काढून टाकावे, असा सल्ला दिला आहे.
या शहरांमध्ये ब्रँडचे लोगो झाकलेब्रँडचे बोर्ड हे मोबाईल विक्रेत्या दुकानदाराच्या फायद्याचे असतात. याद्वारे ब्रँडची जाहिरातही होते आणि त्याचा इन्सेन्टिव्ह दुकानदाराला मिळतो. तसेच कंपन्यांनी स्वत:चे विक्री दालनही खोलले आहेत. दिल्ली एनसीआर, मुंबई, चेन्नई, पुणे, आग्रा आणि पटनासारख्या शहरांमध्ये हे रिटेल स्टोअर आहेत. या स्टोअरना धमक्या मिळू लागल्या आहेत.
अन्य महत्वाच्य़ा बातम्या...
Coronil: रामदेव बाबांच्या कोरोनिल औषधावर ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
Unlock1.0 घाम फोडणार! डिझेल पहिल्यांदाच 80 पार; महागाई वाढणार
न भूतो! पहिल्यांदाच पेट्रोलपेक्षा डिझेल महागले; राजधानीत विक्रम
CoronaVirus बनारसी साड्यांचे कारागीर बनवणार कोविड योद्ध्यांसाठी सुरक्षा कवच!
"रामदेव बाबांना नोबेल द्या"! ट्विटरवर 'कोरोनिल'वरून गट 'सक्रीय'