नवी दिल्ली - लक्षद्वीपचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल यांना अपात्र ठरवणारी अधिसूचना लोकसभा सचिवालयाने जारी केली आहे. खासदार मोहम्मद फैजल यांना नुकतेच केंद्रशासित प्रदेशातील एका न्यायालयाने हत्येचा प्रयत्न करण्याच्या प्रकरणात दोषी ठरवले होते. त्यामुळे मोहम्मद फैजल याचं ११ जानेवारीपासून लोकसभेच्या सदस्यत्व रद्द करण्यात आल्याची माहिती लोकसभा सचिवालयानं दिली आहे.
लक्षद्वीपच्या एका न्यायालयाने बुधवारी लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल यांच्यासह चार जणांना हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. शुक्रवारी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, फैजलला कावरट्टी येथील सत्र न्यायालयाने दोषी ठरवल्याच्या तारखेपासून ११ जानेवारीपासून लोकसभेच्या सदस्यत्वासाठी अपात्र ठरवले आहे. हा निर्णय भारतीय राज्यघटनेच्या कलम 102 (1) (ई) आणि लोकप्रतिनिधी कायदा, 1951 च्या कलम 8 मधील तरतुदींनुसार घेण्यात आला आहे.त्यात म्हटलं आहे की, “लक्षद्वीप, कावरत्तीच्या सत्र न्यायालयाने खटला क्रमांक ०१/२०१७ मध्ये दोषी ठरवल्यामुळे मोहम्मद फैजल पी.पी. भारत राज्यघटनेच्या कलम १०२(१) अन्वये लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेशाच्या लक्षद्वीप संसदीय मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. e) आणि लोकप्रतिनिधी कायदा, 1951 च्या कलम आठ अन्वये दोषसिद्धीच्या तारखेपासून म्हणजेच ११ जानेवारी 2023 पासून लोकसभेच्या सदस्यत्वापासून अपात्र ठरवण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण?२००९ साली घडलेल्या प्रकरणात खासदार फैजल यांच्यासह तीन जणांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच चारही आरोपींना कोर्टाने एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. मोहम्मद फैजल हे शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. लोकसभेत त्यांनी लक्षद्विपच्या प्रश्नांवर अनेकदा रोखठोक भूमिका मांडली आहे. फैजल हे लोकसभेत निवडून आलेले सदस्य आहेत. २००९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान झालेल्या वादाशी संबंधित आहे. लक्षद्वीपचे माजी लोकसभा सदस्य आणि काँग्रेसचे दिग्गज नेते पी.एम. सईद यांचे जावई असलेले काँग्रेस नेते मोहम्मद सल्लेह यांच्यावर एका व्यक्तीने क्रूरपणे हल्ला केला होता. २००५ मध्ये निधन होण्यापूर्वी सईद यांनी १० वेळा लक्षद्वीपचे प्रतिनिधित्व केले. या क्रूर हल्ल्यात सल्लेह गंभीर जखमी झाले होते आणि त्यांना विमानाने कोची येथील खासगी रुग्णालयात दाखल करावे लागले होते.
कोण मोहम्मद फैजल?मोहम्मद फैजल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्षद्विपमधील खासदार आहेत. ते १६ व्या लोकसभेत सदस्य म्हणून निवडून आलेत. २०१४ मध्ये फैजल यांनी मुहम्मद हमदुल्ला सईद यांना हरवलं होते.