ऑनलाइन लोकमत
चित्तोडगड (राजस्थान), दि. 19 - अवघ्या पाच वर्षांच्या कोवळ्या मुलीचं लग्न लावून तिला सप्तपदी कराला लावल्याची घटना राजस्थानमध्ये घडल्याचं वृत्त आहे. या घटनेचा व्हिडीयो व्हारल झाला असून या लग्नाला उपस्थित असलेल्यांनी साधा विरोध केल्याचंही दिसत नाहीये.
या संदर्भात राजस्थानमधलं वसुंधरा राजे सरकार काय कारवाई करतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. अल्पवयीन मुलांचं लग्न करण्यास कायद्यानं बंदी असून भारतामध्ये लहान मुलींची सर्रास लग्न केली जातात हे वास्तव आहे. मात्र, अवघ्या चार - पाच वर्षांच्या मुलीच्या लग्नाचा प्रकार समोर आला असून तो भारतामधल्या अनेक भागांमध्ये किती मागासलेली प्रथा सुरू आहे हे दर्शवते.