केरळात 'झिंगाट'! नळातून आली दारू अन् नुसत्या वासानंच लोकांचं डोकं झिनझिनलं
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2020 12:48 PM2020-02-06T12:48:36+5:302020-02-06T13:00:52+5:30
दारुच्या विहिरींबाबतचे अनेकदा पुस्तके, टीव्हीमध्ये वाचले, पाहिले असेल. पण या साऱ्या कल्पित गोष्टी असतात.
थ्रिसूर : दारुच्या विहिरींबाबतचे अनेकदा पुस्तके, टीव्हीमध्ये वाचले, पाहिले असेल. पण या साऱ्या कल्पित गोष्टी असतात. मात्र, अशा प्रकारची घटना खरोखरच घडली आहे. केरळमधील थ्रिसूर जिल्ह्यातील चलाकडी शहरात ही अजब गजब घटना घडली आहे. येथील एका सोसायटीच्या सदनिकांमध्ये किचनच्या नळाला चक्क दारु यायला लागल्याने रहिवाशांचे धाबेच दणाणले.
सोमवारी सकाळी त्यांनी पाणी भरण्यासाठी नळ सुरू केले. तेव्हा नळातून थोडे पांढरट रंगाचे पाणी येऊ लागले. नंतर दारूचा वास येऊ लागला. सुरवातीला काही समजले नाही. मात्र, नंतर पाण्याच्या टाकीमध्ये कोणीतरी दारू ओतल्याचा संशय आला आणि ही बातमी साऱ्या गावात वाऱ्यासारखी पसरली.
सोसायटीवाल्यांसाठी हे एक रहस्यच होते. मात्र, पालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलावल्यानंतर खरा प्रकार उघड झाला. तपासामध्ये अबकारी विभागाने घातलेला गोंधळ समोर आला. अधिकाऱ्यांनी 4500 लीटर देशी दारू जप्त केली होती. ही दारू त्यांनी नष्ट करण्यासाठी एका खड्ड्यामध्ये फेकून दिली होती. या खड्ड्याच्या बाजुलाच लागून एक विहीर होती. याचा त्यांना अंदाज आला नाही. सोलोमन एव्हेन्यू सोसायटीमध्ये याच विहिरीतून पाणी घेतले जाते.
Xiaomi Redmi Note 6 Pro लागली आग; या चुका 'चुकूनही' करू नका
बर्फाळलेल्या प्रदेशात पाण्यावर तरंगणारे हॉटेल; भाडे सोडा, नजारे पाहूनच म्हणाल अद्भूत
धक्कादायक बाब म्हणजे या सोसायटीधील 18 कुटुंबे गेल्या काही वर्षांपासून प्रदुषित पाणी पित आहेत. यामुळे सुरुवातीला त्यांच्या लक्षात आले नाही. य़ासाठी त्यांना विहिरीचे पाणी दिले जाते. याच विहिरीमध्ये दारू मिसळली गेल्याने ते ही पाणी दुषित झाले आहे, असे नगरसेवक व्ही जे जोशी यांनी सांगितले.