शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचे बुरूज ढासळले, बिहारमध्येही दणका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2018 4:04 PM

ईशान्येतील तीन राज्यांमधील ऐतिहासिक विजयानंतर भाजपाला नव्याने चढलेली विजयाची धुंदी बुधवारी उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकांच्या निकालामुळे पुरती उतरली.

ठळक मुद्देगोरखपुरमध्ये समाजवादी पार्टीच्या प्रवीण निषाद यांनी भाजपाच्या उपेंद्र पटेल यांचा 21 हजार 881 मतांनी पराभव केलाय. येथे भाजपाला 434632 मतं तर सपाला 456513 मतं मिळाली.फुलपूरच्या जागेवर सपा उमेदवार नागेंद्र पटेल यांनी भाजपाच्या कौशलेंद्र पटेल यांना 59 हजार 613 मतांनी धूळ चारली.  बिहारच्या अररिया लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाने मोठा विजय मिळवत भाजपाचा 61 हजार 788 मतांनी  पराभव केला. येथे राजदच्या  सरफराज आलम यांनी भाजपाच्या प्रदीप सिंह यांना पराभूत केले.  याशिवाय बिहारमध्ये दोन जागांवर विधानसभा पोटनिवडणूक झाली.  जहानाबाद येथेही भाजाला दणका देत राजदने विजय मिळवलाय, केवळ भभुआ येथे भाजपाच्या रिंकी पांडे या विजयी ठरल्या आहेत. 

लखनऊ : ईशान्येतील तीन राज्यांमधील ऐतिहासिक विजयानंतर भाजपाला नव्याने चढलेली विजयाची धुंदी बुधवारी उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकांच्या निकालामुळे पुरती उतरली. कारण उत्तर प्रदेशच्या गोरखपूर, फुलपूर आणि बिहारच्या अररिया लोकसभा पोटनिवडणुकांचे निकाल आता जवळजवळ स्पष्ट झाले आहेत. मायावतींच्या बसपाचे पाठबळ लाभलेल्या समाजवादी पक्षाने दोन्ही मतदारसंघात भाजपाला पराभवाची चव चाखायला भाग पाडले आहे. तिनही ठिकाणी भारतीय जनता पक्ष पराभवाच्या छायेत आहे. विशेषतः गोरखपूर आणि फुलपूर मतदारसंघातला पराभव भाजपासाठी धक्कादायक आहे. या दोन्ही मतदारसंघाचे प्रतिनिधित्त्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करत असल्याने ही पोटनिवडणूक भाजपासाठी प्रतिष्ठेची होती. यापूर्वी लोकसभा निवडणुकीत या दोन्ही मतदारसंघात भाजपाने मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता. 

निकाल -

- गोरखपुरमध्ये समाजवादी पार्टीच्या प्रवीण निषाद यांनी भाजपाच्या उपेंद्र पटेल यांचा 21 हजार 881 मतांनी पराभव केलाय. येथे भाजपाला 434632 मतं तर सपाला 456513 मतं मिळाली.

- फुलपूरच्या जागेवर सपा उमेदवार नागेंद्र पटेल यांनी भाजपाच्या कौशलेंद्र पटेल यांना 59 हजार 613 मतांनी धूळ चारली.  

- बिहारच्या अररिया लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाने मोठा विजय मिळवत भाजपाचा 61 हजार 788 मतांनी  पराभव केला. येथे राजदच्या  सरफराज आलम यांनी भाजपाच्या प्रदीप सिंह यांना पराभूत केले.  

- याशिवाय बिहारमध्ये दोन जागांवर विधानसभा पोटनिवडणूक झाली.  जहानाबाद येथेही भाजाला दणका देत राजदने विजय मिळवलाय, केवळ भभुआ येथे भाजपाच्या रिंकी पांडे या विजयी ठरल्या आहेत. 

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशBiharबिहारlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक