शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

शॉकिंग! गुजरातमधून १८ हजार कोटींची अवैध संपत्ती घोषित

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2018 5:55 AM

देशातील एकूण काळ्या पैशाच्या २९ टक्के; नोटाबंदीआधी बाहेर आला बेकायदा पैसा

नवी दिल्ली : गुजरातमधील नागरिकांनी आयडीएस (इन्कम डिक्लरेशन स्किम) योजनेंतर्गत चार महिन्यांत १८ हजार कोटी रुपयांच्या काळ्या पैशांची घोषणा केली असल्याची माहिती आयटीआय (माहितीचा अधिकार) अंतर्गत समोर आली आहे. हे प्रमाण देशातील घोषित काळ्या पैशांच्या २९ टक्के एवढे आहे.

आरटीआयअंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार जून २०१६ ते सप्टेंबर २०१६ या काळात काळ्या पैशांच्या खुलाशातून ही बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे हे आकडे नोटाबंदीच्या दोन महिन्यांपूर्वीचे आहेत. नोटाबंदीची घोषणा ८ नोव्हेंबर २०१६ रोजी झाली होती. देशात काळ्या पैशांची घोषणा झालेली रक्कम ६२,२५० कोटी रुपये इतकी आहे. प्राप्तिकर विभागाला ही माहिती देण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागला. भारतसिंह झाला यांनी आरटीआयअंतर्गत ही माहिती विचारली होती. अहमदाबादचे प्रॉपर्टी डीलर महेश शाह यांनी घोषित केलेल्या १३,८६० कोटींच्या घोषणेनंतर त्यांनी ही माहिती विचारली होती. राजकीय नेते, पोलीस अधिकारी आणि नोकरदार यांची उत्पन्नासंबंधित माहिती देण्याबाबत मात्र प्राप्तिकर विभागाने मौन बाळगले आहे.दोन वर्षांनी दिली माहितीभारतसिंह झाला म्हणाले की, माहिती मिळविण्यासाठी मला दोन वर्षे लागली. पहिल्या वेळी अर्जच हरवला. त्या वेळी विभागाने सांगितले की, अर्ज गुजरातीत आहे. पण, गेल्या ५ सप्टेंबर रोजी मुख्य माहिती आयुक्तांनी माहिती देण्याच्या स्पष्ट सूचना प्राप्तिकर विभागाला दिल्या. त्यानंतरच ही माहिती मला मिळू शकली.

टॅग्स :Rupee Bankरुपी बँकReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ताGujaratगुजरात