नवी दिल्ली : जवळपास निम्मे भारतीय नागिरक नोकरी किंवा उत्पन्नाच्या स्त्रोताशिवाय एक महिन्यापेक्षा जास्त जगू शकत नाहीत. यामुळे लॉकडाऊनमध्ये लाखो मजुरांनी अस्वस्थ होऊन गावचा रस्ता धरला होता. लॉकडाऊनमध्ये अर्थव्यवस्थेची बिकट परिस्थिती, नोकरी जाण्याची चिंता वाढली आहे.
आएएनएएस सी वोटर इकॉनॉमी बॅट्री वेव्ह सर्व्हेनुसार 28.2 टक्के पुरुषांनी सांगितले की, कोणत्याही उत्पन्नाशिवाय एक महिन्यापेक्षा कमी जगू शकतो. तर 20.7 टक्के पुरुषांनी सांगितले की, १ महिन्यापर्य़ंत जगू शकतो. तर 10.7 टक्के लोकांनी सांगितले की, कोणत्याही उत्पन्नाशिवाय ते एक वर्षाहून अधिक काळ जगू शकतात. तर दोन महिने जगण्यासाठी 10.2 टक्के, तीन महिने जगण्यासाठी 8.3 टक्के आणि 4 ते 6 महिने जगू शकणाऱ्या 9.7 टक्के लोकांनी तयारी दर्शविली आहे.
सीवोटरने ५०० हून अधिक लोकसभा मतदारसंघातील लोकांकडून ही माहिती घेतली आहे. यामध्ये 1397 लोकांची मते घेतली आहेत. तर महिलांसाठी एक महिन्याची आकडेवारी सारखीच आहे. 19.9 टक्के महिलांनी सांगितले की, उत्पन्नाशिवाय एक महिन्याहून कमी जगू शकतो. तर 28.4 टक्के महिलांनी सांगितले की, त्या 1 महिना जगू शकतात. हा जवळपास निम्मा भाग होतो.
उच्च शिक्षितांमध्ये जगू शकण्याचा दर जास्तउच्च शिक्षण घेणाऱ्या लोकांचा पगारही तेवढचा जास्त असतो. यामुळे त्यांच्याकडे सेव्हिंगही चांगले असते. यामुळे त्यांच्यामध्ये कोणत्याही उत्पन्नाशिवाय जगण्याची शक्यता जास्त आहे. उच्चशिक्षितांपैकी ३१.६ टक्के लोकांनी सांगितले की ते एक वर्षापेक्षा जास्त काळ तग धरू शकतात. मुस्लिमांमध्ये एक महिन्यापेक्षा कमी काळ तग धरण्याची शक्यता ही 38.4 टक्के लोकांनी वर्तविली आहे. तर एक महिन्यापर्यंत जगू शकण्याची क्षमता 30.2 टक्के लोकांमध्ये आहे. तर या समाजामध्ये ६८ टक्के लोक असे आहेत, जे उत्पन्न नसल्यास एक महिन्यापेक्षा जास्त काळ जगू शकत नाहीत.
पश्चिमेकडे चांगली स्थितीक्षेत्रानुसार पश्चिमेकडे चांगली परिस्थिती आहे. तेथे केवळ 17.2 टक्के लोक एक महिन्यापेक्षा कमी काळ तग धरू शकतात. तर 15 टक्के लोकांनुसार ते एक वर्षापेक्षा जास्त काळ जगू शकतात.
अन्य महत्वाच्या बातम्या...
सावध व्हा! पहिली ओसरली नाहीय, देशात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता
Good News: बळीराजा सुखावला; राज्यात मान्सून डेरेदाखल
भित्रा पाकिस्तान! अफवा पसरली, 'अज्ञात विमाने हवेत उडाली'; अख्ख्या कराचीची वीज घालवली
आजचे राशीभविष्य - 11 जून 2020; वृश्चिक राशीच्या लोकांनी स्त्रियांपासून जपावे