ऑनलाइन लोकमत
गुजरात, दि. 5 - बडोद-यात ब्लड बँकेच्या निष्काळजीपणामुळे 15 रुग्णांच्या जीव धोक्यात आला आहे. ब्लड बँकेनं एक, दोन नव्हे तर तब्बत 15 रुग्णांना HIV संक्रमित रक्त चढवलं आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे, असं वृत्त आज तकनं दिलं आहे. या 15 रुग्णांना एचआयव्ही, हॅपेटायटिस-बी आणि हॅपेटायटिस- सीचे संक्रमित रक्त चढवण्यात आलं आहे. या प्रकारानंतर अन्न आणि औषध विभागानं या ब्लड बँकेकडून उत्तर मागितलं आहे. दूषित रक्त चढवण्यात आलेल्या पीडितांमध्ये 7 महिला आणि 8 पुरुषांचा समावेश आहे. या प्रकारासंदर्भात ब्लड बँकेचे विश्वस्त डॉ. विजय शाह यांना विचारणा केली असता, त्यांनी हे मशिनच्या चुकीमुळे झाल्याचं सांगितलं आहे. त्यानंतर गुजरात सरकारच्या आरोग्य विभागाकडून या ब्लड बँकेला नोटीस पाठवण्यात आली आहे. तसेच ब्लड बँकेतून ब्लड देणे आणि घेण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या ब्लड बँकेचे विश्वस्त डॉ. विजय शाह भाजपाकडून नगरसेवकही राहिले आहेत. तत्पूर्वी ब्लड बँकेच्या चुकीमुळे 12 थेलेसेमिया लहानग्यांना एचआयव्ही ब्लड देण्यात आलं होतं. त्यानंतर 6 मुलांचा मृत्यू झाला होता.