शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News Live:रतन टाटांची अंत्ययात्रा ४ वाजता; वरळी येथील स्मशानभूमीत पार्थिवावर होणार अंत्यसंस्कार
2
अमेरिकेनं इस्रायलला एक वर्षात दिले 18,47,15,19,00,000 रुपयांचे शस्त्रास्त्र! लिस्ट बघून धक्का बसेल, डोकं गरगरेल
3
रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला केंद्रातून अमित शाह येणार; पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यावर
4
आजारी कर्मचाऱ्याला पाहायला पुण्याला गेले; हा एकच किस्सा रतन टाटांच्या कामाची पद्धत सांगून जातो
5
संजय राऊतांविरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल; लाडकी बहीणविषयी केलेलं वक्तव्य पडलं महागात
6
कर्मचाऱ्याचा जीव वाचवण्यासाठी विमान उडवायला तयार झाले होते रतन टाटा, नेमकं काय घडलं होतं? पुण्यातला आहे किस्सा
7
निवडणुकीपूर्वीच काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत गटबाजी; मुख्यमंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू?
8
Ratan Tata Net Worth: आपल्या मागे किती संपत्ती सोडून गेले रतन टाटा; दानच ९००० कोटींवर केलेले...
9
अमिताभ बच्चन यांच्या सिनेमातून रतन टाटांनी घेतली होती बॉलिवूडमध्ये एन्ट्री, पण सिनेमा फ्लॉप ठरला अन्...
10
बापरे! विमान तब्बल ३४००० फूट उंचीवर असतानाच पायलटचा मृत्यू; नेमकं काय घडलं?
11
'ताज' बाहेरचे 'ते' कुत्रे आज पुन्हा पोरके झाले...टाटांनी मिळवून दिली होती हक्काची जागा!
12
Congo Fever : राजस्थानमध्ये खतरनाक आजाराची एन्ट्री; कांगो तापाने महिलेचा मृत्यू, सरकारने जारी केला अलर्ट
13
Ratan Tata : रतन टाटांनी देशासाठी एवढे केले, जे कुणालाही जमणार नाही; सच्च्या देशभक्ताच्या या दहा गोष्टी...
14
'फक्त कंपनीला नाव नाही तर देशाला कीर्ती दिली..'; रतन टाटांच्या निधनानंतर दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
15
"हे टाटाच्या डीएनएमध्ये आहे...!" रतन टाटा यांची इच्छा, चेअरमन पद; लोकांना देत होते केवळ एकच सल्ला!
16
रतन टाटा यांच्या प्रेमात होती 'ही' बॉलिवूड अभिनेत्री, निधनानंतर शेअर केली भावुक पोस्ट, म्हणते- "तुम्ही गेलात पण..."
17
Donald Trump : "मोदी महान आहेत, ते वडिलांसमान वाटतात"; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं पंतप्रधानांचं भरभरून कौतुक
18
Ratan Tata : रतन टाटांवर सरस्वती आणि लक्ष्मीचा वरदहस्त कायम असण्यामागे होते 'हे' कारण!
19
रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात एक दिवसाचा दुखवटा जाहीर; कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत
20
असा माणूस पुन्हा होणे नाही! रतन टाटांच्या निधनानंतर रितेश देशमुखने ट्वीट करत वाहिली श्रद्धांजली

एअर इंडियाच्या विमानात किळसवाणा प्रकार; मुंबई-दिल्ली फ्लाइटमधील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 10:29 AM

राम सिंह असे आरोपीचे नाव असून त्याला दिल्लीच्या IGI पोलिसांकडे (इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ) सोपवण्यात आले आहे.

मुंबई : एअर इंडियाच्या विमानात पुन्हा एकदा धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या विमानात एका प्रवाशाने लघुशंका आणि शौच केली. इतकेच नाही तर यानंतर तो विमानात थुंकत राहिला. ही घटना 24 जूनची आहे. राम सिंह असे आरोपीचे नाव असून त्याला दिल्लीच्या IGI पोलिसांकडे (इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ) सोपवण्यात आले आहे.

दिल्ली पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम 294/510 अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना फ्लाइट क्रमांक AIC866 मध्ये घडली आहे. या प्रवाशाने केबिन क्रू मेंबर आणि इतर प्रवाशांसोबत वादही घातला. बराच वेळ हा गोंधळ सुरू होता. यासंदर्भात क्रू मेंबरने तातडीने विमानाच्या पायलटला आणि एअर इंडिया सिक्योरिटीला याबाबतची माहिती दिली. 

प्रवाशी राम सिंह दिल्लीत उतरताच त्याला आयजीआय विमानतळ पोलीस ठाण्याच्या पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. 24 जून 2023 रोजी मुंबईहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या AIC 866 फ्लाइटमध्ये प्रवासी राम सिंह सीट क्रमांक 17F वर बसला होता. तिथेच त्याने शौच केले आणि लघुशंका केली, असे पोलिसांनी सांगितले.

विमानाच्या केबिन क्रूने या घटनेवर आक्षेप घेतला. प्रवाशाला तिथून हटवण्यात आले. केबिन क्रू अमन वत्स यांनी पायलट-इन-कमांड कॅप्टन वरुण संसारे यांना घटनेची माहिती दिली. याची माहिती तातडीने एअर इंडियाला पाठवण्यात आली. विमान उतरताच प्रवाशाला सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेवर विमानातील इतर प्रवाशांनीही नाराजी व्यक्त केली. दरम्यान, याआधीही विमानात प्रवाशांनी लघुशंका केल्याचे प्रकार समोर आले आहेत.

टॅग्स :Air Indiaएअर इंडिया