नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे देशभरात 9 हजार हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या आकड्यामध्ये जे लोक कोरोनाच्या भितीमुळे जगू शकले नाहीत त्यांचा समावेश नाहीय. म्हणजेच कोरोनाच्या भितीने आत्महत्या करणाऱ्यांचा आकडा मोठा आहे. असेच एक प्रकरण दिल्लीमध्ये घडले आहे. भारतीय महसूल सेवा अधिकाऱ्याने आत्महत्या केली आहे.
इंडियन रेव्हेन्यू सर्विस ऑफिसर शिवराज सिंह असे त्यांचे नाव असून ते आयकर विभागामध्ये अप्पर आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांनी कारमध्ये अॅसिडसारखा पदार्थ प्राशन करून जीवन संपवले. त्यांच्या कारमध्ये एक चिठ्ठी सापडली. त्यामध्ये त्यांनी 'माझ्यापासून कुटुंबाला कोरोनाची लागण होईल, त्यांना कोरोना देऊ शकत नाही. यामुळे आत्महत्या करत आहे.'' असे लिहिले आहे.
एका आठवड्यापूर्वीच त्यांनी कोरोनाची टेस्ट केली होती. मात्र, रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मात्र, तरीही त्यांना भिती वाटत होती की त्यांच्यामुळे कुटुंबाला कोरोनाची लागण होईल, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. प्राथमिक तपासात त्यांनी अॅसिड पिल्याने मृत्यू झाल्याचे दिसत आहे. ते सध्याच्या परिस्थितीमुळे खूप निराश झाले होते. पोस्टमार्टेम केल्यानंतर त्यांचा मृतदेह कुटुंबीयांना देण्यात आला.
आयआरएस अधिकारीशिवराज सिंह हे 2006 च्या बॅचचे आयआरएस अधिकारी होते. ते द्वारका सेक्टर ६ मधील सन्मती अपार्टमेंटमध्ये राहत होते. त्यांची ड्यूटी आर के पूरमच्या आयकर विभागात होती. रविवारी सायंकाळी घराच्या बाहेर कार उभी करत त्यांनी आत्महत्या केली. यानंतर शरीर जळायला लागले तेव्हा ते कारमधून बाहेर आले आणि सारे कपडे काढून फेकायला लागले. अपार्टमेंटच्या गार्डने य़ाची माहिती कुटुंबीयांना दिली. त्यांनी हॉस्पिटलमध्ये हलविले मात्र, उपचारावेळी त्यांचा मृत्यू झाला.
अन्य महत्वाच्या बातम्या....
वाह प्रेमजी! दिलेल्या शब्दाला जागले; आयटी कंपनीला कोरोना हॉस्पिटल बनवले
अधुरी प्रेम कहानी! GF ला भेटण्यासाठी मध्यरात्री गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला डॉक्टर; जिवाला मुकला
दक्षिण कोरियात खळबळ! लष्करी कारवाई करा; किम जोंग उनच्या बहिणीचे सैन्याला 'आदेश'