धक्कादायक! माफिया 'अतीक अहमद शहीद, भारतरत्न द्या'; काँग्रेसच्या पालिका उमेदवाराने कबरीवर तिरंगा ठेवला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 07:31 PM2023-04-19T19:31:35+5:302023-04-19T19:32:02+5:30

माफिया अतीक अहमदची कबर देखील पोलिसांसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील बॅनरनंतर प्रयागराजमध्ये व्हिडीओ व्हायरल.

Shocking! Mafia 'Atiq Ahmad Shaheed, Give Bharat Ratna'; The Congress municipal candidate placed the tricolor on the grave and demand | धक्कादायक! माफिया 'अतीक अहमद शहीद, भारतरत्न द्या'; काँग्रेसच्या पालिका उमेदवाराने कबरीवर तिरंगा ठेवला

धक्कादायक! माफिया 'अतीक अहमद शहीद, भारतरत्न द्या'; काँग्रेसच्या पालिका उमेदवाराने कबरीवर तिरंगा ठेवला

googlenewsNext

माफिया अतीक अहमद याची पोलिसांच्या गराड्यातच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यानंतर त्याचा आणि त्याच्या भावाचा मृतदेह दफन करण्यात आला. अतीकच्या कबरीवर काँग्रेसच्या नगरपरिषदेच्या उमेदवाराने तिरंगा ठेवून अतीकला शहीद म्हणत भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. या धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून काँग्रेसने त्याला सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले आहे. 

उत्तर प्रदेशमध्ये स्थानिक निवडणुका आहेत. यामध्ये काँग्रेसने उमेदवारी दिलेला राजकुमार उर्फ रज्जू भैया या उमेदवाराने हा प्रकार केला आहे. माफिया अतीकला त्याने शहीद असल्याचे म्हटले आहे. अतीकच्या कबरीवर जाऊन तिरंगा लपेटला आणि त्याला सलामी देखील दिली आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये तो अतीकला शहीदचा दर्जा मिळवून देणार असल्याचे म्हणत आहे. 

ही घटना समोर आल्यानंतर प्रयागराज पोलिसांनी प्रयागराजच्या नगरसेवकपदाच्या उमेदवाराविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. पोलिसांनी राजकुमारला ताब्यात घेतले आहे. 16 एप्रिल रोजी, अतीक-अश्रफ यांना प्रयागराजच्या कासारी-मासारी स्मशानभूमीत दफन करण्यात आले होते. आता त्याची कबर देखील पोलिसांसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. 

बीडमध्ये शहीदचे बॅनर...
असेच एक विचित्र प्रकरण महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात घडले आहे. माजलगाव शहरातील भर चौकात अतीक अहमद याचा बॅनर लावण्यात आला होता, त्यावर शहीद असे लिहिले होते. बॅनर पाहून लोक संतापले आणि त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जात बॅनर हटवून दोघांना अटक केली आहे. 

Web Title: Shocking! Mafia 'Atiq Ahmad Shaheed, Give Bharat Ratna'; The Congress municipal candidate placed the tricolor on the grave and demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.