धक्कादायक! दारुच्या नशेत 'तो' चावला सापला अन् 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2018 11:20 AM2018-02-25T11:20:10+5:302018-02-25T11:20:28+5:30

साप चावल्यानंतर माणसाचा मृत्यू झाल्याचे आपण ऐकल असेल किंवा वाचल असेल. पण माणूस चावल्यामुळं सापाचा मृत्यू झाल्याची घटना तुम्ही ऐकली आहे का?

shocking-man-bites-snake-and-it-dies | धक्कादायक! दारुच्या नशेत 'तो' चावला सापला अन् 

धक्कादायक! दारुच्या नशेत 'तो' चावला सापला अन् 

Next

मुरैना : साप चावल्यानंतर माणसाचा मृत्यू झाल्याचे आपण ऐकल असेल किंवा वाचल असेल. पण माणूस चावल्यामुळं सापाचा मृत्यू झाल्याची घटना तुम्ही ऐकली आहे का? होय. मध्यप्रदेशमध्ये ही घटना घडली आहे. दारुच्या नशेत एका तरुणाने चक्क सापाचा चावा घेतला. यात सापाचाच मृत्यू झाला आहे.  स्थानिक ठिकाणी या या घटनेची चवीनं खमंग चर्चा सुरु आहे. आपल्या शेतावर दारु पिण्यासाठी हा तरुण गेला होता. दारुच्या नशेत त्यानं चक्क सापाला पकडले आणि त्याचा चावा घेतला. त्यामध्ये त्या सापाचा मृत्यू झाला अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे. 

मध्यप्रदेमधील मुरैना जिल्ह्यातील सबलगढ तालुक्यातील पचेर गावात ही  घटना घडली आहे. 34 वर्षीय कल्याण जालिम सिंह कुशवाह या तरुणानं दारूच्या नशेत सापाला पकडलं आणि त्याला चावा घेतला. यात सापाचा मृत्यू झाला. सापाला चावल्यानंतर कल्याण जालिम सिंह कुशवाह  बेशुद्ध पडला. त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारानंतर त्याला सध्या रुग्णालयातून सोडून देण्यात आलं. 

जिल्हा रुग्णालयाचे डॉ. राघवेंद्र यादव म्हणाले की, उपचारानंतर तरुणाला सोडलं आहे. दारुच्या नशेत त्यानं सापचा चावा घेतल्यामुळं सापाचा मृत्यू झाला. पण या तरुणाला थोड्याप्रमाणात विशबाधा झाली होती. प्राथमिक उपचारानंतर त्याला सोडण्यात आलं आहे. 

Web Title: shocking-man-bites-snake-and-it-dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.