शहरं
Join us  
Trending Stories
1
'बटेंगे तो कटेंगे'ला उद्धव ठाकरेंचं उत्तर; म्हणाले, "तुटू देणार नाही आणि..."
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ही लढाई महाराष्ट्रप्रेमी विरुद्ध महाराष्ट्रद्रोही'; उद्धव ठाकरेंनी कोल्हापुरातून रणशिंग फुंकलं
3
ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे पुन्हा तक्रार; मिलिंद देवरांच्या प्रचारावर आक्षेप
4
रोहित नसेल तर बुमराहला कर्णधार करू नका, 'या' खेळाडूला कॅप्टन्सी द्या; माजी क्रिकेटरचा सल्ला
5
Salman Khan : सलमान खानला धमकी देणाऱ्याला अटक, स्वतःला म्हणत होता लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ
6
"आता कुठे तरी थांबलं पाहिजे, नव्या पिढीला...’’, शरद पवारांकडून राजकीय निवृत्तीचे संकेत?  
7
'बंटेंगे तो कटेंगे'... योगी आदित्यनाथ ठरणार निवडणुकीत 'ट्रम्प कार्ड', PM मोदींपेक्षा जास्त सभा घेणार!
8
महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? अजितदादांचे नाव घेत नवाब मलिकांचे मोठे विधान
9
याला म्हणतात परतावा...! 30 दिवसांत पैसा डबल...! कोसळत्या बाजारातही रॉकेट बनला हा शेअर; किंमत ₹10 पेक्षाही कमी
10
विराट 'बाबा' On Duty! दोन लेकरांसह विराट निघाला सफरीला, अनुष्काने शेअर केला खास Photo
11
कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवारांची कोंडी?; नाम साधर्म्य असलेल्या उमेदवाराला मिळाले ट्रम्पेट चिन्ह!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : संजय वर्मा महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची नियुक्ती
13
रेल्वे स्टेशनवर सुटकेमध्ये मृतदेह, गुपचूप पळणाऱ्या बाप-लेकीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
सुनील तटकरे महायुतीशी गद्दारी करतायेत; शिंदे गटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
15
सेल्फीमुळे गेला जीव; राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या टेबल टेनिसपटूंचा तलावात बुडून मृत्यू
16
IPL 2025 Mega Auction: MI शिवाय या ४ फ्रँचायझी संघात सेट होऊ शकतो Arjun Tendulkar
17
“उमेदवारी यादी आधीच दिली, ते माघारीचे कारण नाही, मनोज जरांगेंवर दबाव...”: राजरत्न आंबेडकर
18
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
19
"...मग पंतप्रधान कशाला होता, मुख्यमंत्री व्हा"; बारामतीतून शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा
20
भारताच्या लाजिरवाण्या पराभवाने BCCI 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; गौतम गंभीरवर होणार प्रश्नांची सरबत्ती

Shocking News!: रुग्णवाहिकेनं फक्त 4Km साठी घेतले तब्बल 10,000 रुपये, IPSनं शेअर केली पावती!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2021 7:45 PM

या काळात, जशी मानुसकीची अनेक उदाहरणे पाहायला मिळत आहेत. तशीच मानुसकीला काळीमा फासणारी उदाहरणेही पाहायला मिळत आहेत.

नवी दिल्ली - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात थैमान घातले आहे. परिस्थिती किती गंभीर आहे हे सर्वांनाच माहित आहे. आज अनेक मोठ्या शहरांत ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. मेडिकल सप्लाय मिळेनासे झाले आहे. रुग्णांना बेड मिळणेही कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत लोक रुग्णालयाबाहेर रुग्णवाहिकांमध्येच, आपला क्रमांक केव्हा येणार, याची वाट पाहताना दिसत आहेत. याच काळात, जशी मानुसकीची अनेक उदाहरणे पाहायला मिळत आहेत. तशीच मानुसकीला काळीमा फासणारी उदाहरणेही पाहायला मिळत आहेत. यातच, एका रुग्णवाहिका ऑपरेटरने जे केले त्यावर लोक संताप व्यक्त करत आहेत.  (shocking news ambulance charges rs 10000 for 4 km news from delhi ips shared receipt)

CoronaVirus: भारतावर कोरोना संकट, परदेशी माध्यमांत पंतप्रधान मोदींवर प्रचंड टीका!

4 किलोमीटरसाठी 10,000 रुपये -आयपीएस अधिकारी अरुण बोथरा यांनी रुग्णवाहिकेच्या बिलाचा एक फोटो शेअर केला आहे. यात लिहिले आहे, की दिल्लीत 4 किलो मीटरसाठी रुग्णवाहिकेचे भाडे 10,000 रुपये. आज जग केवळ जगातील हाहाकारच नव्हे, तर आपले नैतिक मुल्यही पाहत आहे. या घटनेत हुग्णवाहिका ऑपरेटरने एका रुग्णाला 10,000 रुपये बील आकारले आहे. जी पावती शेअर करण्यात आली आहे, ती कुण्या DK Ambulance Service ची आहे.

लोकांनी सांगितले दुःख -एका युझरने या ट्विटवर कमेंट करताना म्हटले आहे, की त्याच्या जवळपासही अशाच पद्धतीने लुटालूट सुरू आहे. एवढेच नाही, तर यांच्या शेजारच्या मृत व्यक्तीला 5 किलो मीटर अंतरावर घेऊन जाण्यासाठी 22 हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती, असेही या युझरने म्हटले आहे. यावरून सहजपणे समजू शकते, की कशापद्धतीने कोरोनाचा सामना करत असलेल्या लोकांच्या मजबुरीचा फायदा घेतला जात आहे.

खूशखबर! रशियन कोरोना लस Sputnik-Vची पहिली खेप भारतात दाखल; जाणून घ्या, किती आहे प्रभावी

...तरच आपण या घातक आजारावर मात करू शकतो -कोरोनाचा सामना करत असलेल्या लोकांच्या मजबुरीचा कुणी फायदा घेत असेल, तर अशा लोकांनी हेही लक्षात ठेवायला हवे, की संपूर्ण जग, त्यांचा हा प्रकार पाहत आहे. या कठीण काळात लोकांनी लोकांच्या कामी येणे आवश्यक आहे. आपण एकमेकांची गरज ओळखून, त्यांना सहकार्य करूनच या गंभीर आणि घातक आजारावर मात करू शकतो.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर