हावडा: पश्चिम बंगालच्या हावडामध्ये ही माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एकिकडे कोरोनाच्या माहामारी लोकांमध्ये माणूसकीचे दर्शन अनेक ठिकाणी घडलेलं असताना आता या घटनेने मात्र खळबळ निर्माण केली आहे. एका ५४ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सोमवारी रुग्णालयात जात असतानाच या महिलेला जीव गमवावा लागला. सोसायटीतील इतर लोकांना या महिलेच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर त्यांनी या महिलेचा मृतदेह घरी नेण्यास म्हणजेच सोसायटीत प्रवेश करण्यास नकार दिला.
७ तासांपर्यंत हावडा महापालिकेच्या गाडीची कुटुंबियांना वाट पाहावी लागली. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार ही महिला ज्या ठिकाणी राहत होती. त्याठिकाणी कटेंटमेंट झोन होता. तीन दिवसांपूर्वी या महिलेने सरकारी रुग्णालयात तपासणी करून घेतली होती. त्याठिकाणी सॅपल घेऊन या महिलेला घरी पाठवण्यात आले. सोमवारी रिपोर्ट आल्यानंतर कळले की ही महिला कोरोना पॉजिटिव्ह आहे.
या महिलेचे नाव पार्बती असून त्यांचे पती व्यावसाईक आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ही महिला आपल्या कुटुंबासह या इमारतीत वास्तव्यास होती. रविवारी रात्री या महिलेची अवस्था खराब झाली होती. त्यानंतर कुटुंबातील लोक त्यांना दवाखान्यात घेऊन जाण्यास निघाले. पण रस्त्यातच या महिलेचा मृत्यू झाला. मृतदेह सोसायटीच्या आत नेण्यासाठी स्थानिकांनी नकार दिला.
त्यांचा मोठा मुलगा घनश्याम यांनी सांगितले की, ''गुरूवारी आईला ताप, सर्दी आणि श्वास घ्यायला त्रास होत होता. मग आम्ही शुक्रवारी तपासणीसाठी आईला रुग्लायलात नेलं. सॅम्पल टेस्ट केल्यानंतर घरी सोडण्यात आले. पण घरी आल्यानंतर आईची समस्या वाढतच गेली. रविवारी असहय्य वेदना जाणल्याने आम्ही आईला रुग्णालयात घेऊन गेलो. पण रस्त्यातच आईचा मृत्यू झाला. त्यानंतर सोसायटीच्या खाली मृतदेहासह आम्हाला वाट पाहावी लागली. तोपर्यंत महापालिकेचे कर्मचारीही त्या ठिकाणी दाखल झाले तीच्या गेटवर ६ नव्हते. त्यानंतर ४ वाजता अंत्यंसंस्कार करण्यात आले.'' महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कर्मचारी वर्गाचा अभाव असल्यामुळे त्या ठिकाणी पोहोचण्यास उशीर झाला.
खाद्यपदार्थांना विषाणू आणि जंतूंपासून दूर ठेवण्यासाठी WHO ने सांगितल्या 'या' गाईडलाईन्स
देशात कोरोनाबाधितांचा आकडा ९ लाखांवर; पण 'या' ९ गोष्टी दिलासादायक