डेहराडून, दि. 19 - भारतीय महिला संघाला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत नेण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या एकता बिश्त हिच्यासोबत उत्तराखंड सरकारनं लाजिरवाणी गोष्ट केली आहे. डेहराडून येथील रेसकोर्स मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्तानं रविवारी मुलींना वाचवा- मुलींना शिकवा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.या कार्यक्रमात एकताला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं होतं. परंतु भाजपा नेते व मंत्र्यांनी मंचावरची सर्व जागा व्यापून टाकली होती. एकतानं मंचावर जाण्याचा प्रयत्न केला असता, सुरक्षारक्षकांनी तिला धक्के मारून मंचावरून खाली उतरवलं. या कार्यक्रमाला उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत, भाजपा प्रदेशाध्यक्ष अजय भट्ट, राज्य सरकारमधील मंत्री धनसिंह रावत व महिला-बाल कल्याणमंत्री रेखा आर्य मंचावर उपस्थित होत्या. त्यांच्यासोबत भाजपाचे असंख्य कार्यकर्ते मंचावर चढले व त्यांनी पूर्ण मंचच व्यापून टाकला. त्याच वेळी एकदा बिश्तही तिथे आली. तिने मंचावर जाण्याचा प्रयत्न केला असता सुरक्षारक्षकांनी तिला रोखलं. तसेच तिला धक्के मारून मंचावरून उतरवलं. त्यामुळे एकता मंचाच्या खाली सामान्य लोकांसाठी लावलेल्या खुर्चीवर जाऊन बसली. कार्यक्रम सुरू झाला व उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी मंचावरून एकता बिश्तचं नाव घेतलं. एकता मंचावर नसल्यानं नाव घेताच आयोजकांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यानंतर जनतेमधून तिला मंचावर आणण्यात आलं. या सर्व प्रकारामुळे क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.दुसरीकडे उत्तराखंडच्या महिला आणि बालविकास मंत्री रेखा आर्य यांनी क्रिकेटपटू एकता बिश्त हिचा अपमान झाल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. एकदा फारच आनंदानं कार्यक्रमात सहभागी झाली होती. तिनं 55 किलोमीटरची सायकल रॅलीसुद्धा पूर्ण केली. तसेच एकताचा हरिद्वार आणि डेहराडूनमध्ये सन्मानही करण्यात आला. जर एकताला काही आक्षेप असता तर ती स्वतः बोलली असती, विनाकारण चांगल्या कामात नको शोधायची काय गरज आहे, असंही रेखा आर्य म्हणाल्या आहेत. महिला क्रिकेट विश्वचषकात एकतानं पाकिस्तानविरोधात पाच बळी मिळवले होते. तसेच एकतानं 46 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात जवळपास 71 बळी घेतले आहेत.
धक्कादायक! पाकिस्तानला धूळ चारणा-या महिला क्रिकेटपटूला धक्के मारून उतरवलं मंचावरून
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2017 7:15 AM
भारतीय महिला संघाला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत नेण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या एकता बिश्त हिच्यासोबत उत्तराखंड सरकारनं लाजिरवाणी गोष्ट केली आहे. डेहराडून येथील रेसकोर्स मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्तानं रविवारी मुलींना वाचवा- मुलींना शिकवा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
ठळक मुद्दे एकता बिश्त हिच्यासोबत उत्तराखंड सरकारनं लाजिरवाणी गोष्ट केली डेहराडून येथील रेसकोर्स मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्तानं रविवारी मुलींना वाचवा- मुलींना शिकवा या कार्यक्रमाचं एकता निमंत्रण होतंसुरक्षारक्षकांनी एकताला धक्के मारून मंचावरून खाली उतरवलं