नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीचा नियमितपणे दौरा करत असतात. मात्र याच वाराणसीमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. काही कुरापतखोर व्यक्तींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वारणसीमधील संसदीय कार्यालय चक्क ओएलएक्सवर विक्रीस टाकल्याचे उघडकीस आले आहे.पंतप्रधान मोदींच्या वारणसीमधील या कार्यालयाची छायाचित्रे घेऊन ती वस्तूंची पुनर्विक्री करणारी साईट असलेल्या ओएलएक्सवर अपलोड करण्यात आली. तसेच या कार्यालयाची विक्रीसाठीची किंमत साडे सात कोटी एवढी सांगण्यात आली. तसेच कार्यालयाच्या आतील सुविधा, खोल्या, पार्किंग यांचीही माहिती ओलएलएक्सवरील या जाहिरातीमधून देण्यात आली.दरम्यान, हा प्रकार समजताच पोलिसांनी संबंधित जाहिरात ओएलएक्सवरून हटवली. तसेच ही जाहिरात ज्या व्यक्तीने ओएलएक्सवर टाकली होती. त्यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. एकूण चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यापैकी एकाला अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले.
धक्कादायक, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कार्यालय OLXवर काढले विक्रीला, एवढी लावली किंमत
By बाळकृष्ण परब | Published: December 18, 2020 12:17 PM
Narendra Modi Office News : नरेंद्र मोदींचे संसदीय कार्यालय चक्क ओएलएक्सवर विक्रीस टाकल्याचे उघडकीस आले आहे
ठळक मुद्देया कार्यालयाची छायाचित्रे घेऊन ती वस्तूंची पुनर्विक्री करणारी साईट असलेल्या ओएलएक्सवर अपलोड करण्यात आली या कार्यालयाची विक्रीसाठीची किंमत साडे सात कोटी एवढी सांगण्यात आलीहा प्रकार समजताच पोलिसांनी संबंधित जाहिरात ओएलएक्सवरून हटवली