मध्य प्रदेशमधील अलिराजपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणीने टोकाचं पाऊल उचलत जीवन संपवल्या प्रकरणी काँग्रेसचे जोबट विधानसभा मतदारसंघातील आमदार महेश पटेल यांचा मुलगा पुष्पराज याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुष्पराज हा सदर तरुणीला मागच्या वर्षभरापासून त्रास देत होता. तसेच तिच्यावर विवाहासाठी दबाव आणत होता. या तरुणीचा दुसऱ्या तरुणाशी साखरपुडा झाल्यानंतर आरोपीने तिला बदमान केले. त्यामुळे तिचं लग्न मोडलं. तसेच या धक्क्यामुळे खचलेल्या तरुणीनं टोकाचं पाऊल उचलत जीवन संपवलं. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. तसेच आरोपी हा आमदार पुत्र असल्याने त्यावरून राजकारणही सुरू झालं. तसेच भाजपाने काँग्रेस पक्ष हा महिला विरोधी असल्याचा आरोप केला.
पोलिसांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, मृत तरुणीचं नाव दामिनी ठाकूर होतं. ती नगरपालिकेच्या माजी सीएमओ आशा ठाकूर यांची मुलगी होती. तरुणीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, जोबट येथील आमदार सेना महेश पटेल यांचा मुलगा पुष्पराज हा त्यांच्या मुलीवर एकतर्फी प्रेम करायचा. मात्र मुलगी आणि तिचे कुटुंबीय याला विरोध करायचे. तसेच त्यांनी या मुलीचं लग्नही दुसऱ्या ठिकाणी ठरवून टाकलं होतं. मात्र ही बाब पुष्पराजला समजल्यानंतर त्याने सदर तरुणीची बदनामी केली. या बदमानीमुळे तरुणीचं लग्न मोडलं. तसेच ती घडल्या प्रकारामुळे खचून गेली. तसेच अखेरीस तिने टोकाचं पाऊल उचललं.
मृत तरुणीच्या नातेवाईकांनी सांगितलं की, पुष्पराज याने दुसऱ्यांदा त्यांच्या मुलीचं लग्न मोडलं होतं. तत्पूर्वी २०१९ मध्ये या तरुणीचं लग्न गुजरातमध्ये ठरलं होतं. मात्कर आरोपीने तिच्या सासरच्या मंडळींना घाबरवून धमकावून हे लग्न मोडलं. तसेच त्यावेळी त्याने या तरुणीच्या चारित्र्यावरही शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केला होता. तो तिच्याबरोबर जबरदस्तीने बोलायचा प्रयत्न करायचा. या सर्वामुळे ही तरुणी घाबरून राहायची.
या घटनेनंतर भाजपाने काँग्रेसवर जोरदार हल्ला केला आहे. तसेच काँग्रेसची महिलांबाबतची मानसिकता घृणित असल्याचा आरोप केला आहे. ही घटना काँग्रेसी नेत्यांच्या घृणित मानसिकता आणि महिलांप्रति विकृत बुद्धीचं उदाहरण आहे, असा आरोप केला आहे.