शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यावरून चंद्रपूरकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला यवतमाळजवळ भीषण अपघात; ३० प्रवासी जखमी
2
खेड तालुक्यात खळबळजनक घटना! ग्रामस्थांनी नराधमाच्या घरासमोरील ट्रॅक्टर पेटवला, घरालाही लावली आग
3
मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत; एक्स्प्रेस गाड्याही रखडल्या!
4
First ATM: केवळ ११,२०० लोकसंख्येचा असा देश, जिथे एकही ATM नव्हतं; आता सुरु झालं पहिलं एटीएम
5
भीषण, भयंकर! ...अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; १७ सेकंदाचा अंगावर काटा आणणारा Video
6
शाहरुखच्या 'सर्कस' मालिकेतील मारियासाठी रेणुका शहाणेंना नव्हती पहिली पसंती, पण अशी मिळाली ही भूमिका
7
उपचार घेत असलेल्या एअर होस्टेसवर लैंगिक अत्याचार, ICU लॅबमधील टेक्निशियनला अटक; CCTV मुळे आरोपी जाळ्यात
8
दिल्लीत चार मजली इमारत कोसळली, ४ जणांचा मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले
9
धोनी, अशनीर ग्रोव्हर ते दीपिका पादुकोण... BluSmart मध्ये दिग्गजांचे पैसे बुडाले, आता कंपनी बुडण्याच्या मार्गावर
10
Mumbai: चेंबूर परिसरात बीएमसीचा कचरावाहू ट्रक उलटला; एकाचा मृत्यू, दोन जखमी
11
बेकायदा बांधकामांमुळे नियोजित विकासाला धोका, उच्च न्यायालयाने 'बीएमसी'ला फटकारले
12
चीन सोबत डील, पॉलिसीमध्ये बदल; ट्रम्प यांनी हार मानली का? अचानक का बदलले त्यांचे सूर
13
Video: धक्कादायक! जिममध्ये वर्कआऊट करताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
14
करण जोहर दिवसेंदिवस होत चाललाय बारीक, अवस्था पाहून चाहते चिंतेत, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाला…
15
मला झालेला आजार हा अर्धांगवायू नसून...; मंत्र्यांचा दावा खोडत धनंजय मुंडेंनी प्रकृतीबाबत केला खुलासा
16
जगभर: मोकळा आणि प्रदूषणमुक्त श्वास, पॅरिसमधले ५०० रस्ते फक्त चालण्यासाठी!
17
World Press Photo of the Year: आई, आता मी तुला मिठी कशी मारू?
18
हृदयद्रावक! ऑटोतून आईसोबत खाली उतरला अन ट्रकने चिमुकल्याला चिरडले; घटनेनंतर तणावाचे वातावरण
19
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२५: आजचा दिवस आनंदात जाईल, प्रत्येक कामात यश मिळेल
20
अग्रलेख: वक्फ कायद्याला झटका, ...तर नव्या कायद्याचा उद्देशच नष्ट होईल

मुस्कानला जमलं नाही म्हणून साहिलने हात धरुन केले खोल वार; सौरभच्या हत्येचा अहवाल समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 15:34 IST

सौरभ राजपूतचा शवविच्छेदन अहवाल समोर आला असून धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.

Meerut Murder Case: मेरठच्या सौरभ राजपूत हत्या प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे होत आहे. सौरभची पत्नी मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिलने त्याच्या विरोधात भयंकर कट रचत त्याला संपवलं. जवळपास महिनाभर कट रचून दोघांनी मिळून सौरभ राजपूतची निर्घृणपणे हत्या केली. मुस्कान आणि साहिलने  सौरभची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे करून ड्रममध्ये भरले होते. सौरभच्या हत्येच्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. मात्र आता सौरभच्या शवविच्छेदन अहवालातून मुस्कानच्या निरागस चेहऱ्यामागचा क्रूरपणा समोर आला आहे.

लंडनहून परतलेल्या सौरभची मुस्कान आणि साहिलने मिळून हत्या केली होती. त्याच्या मृतदेह सिमेंटच्या ड्रममध्ये भरुन त्याची विल्हेवाट लावण्याचा दोघांचा प्रयत्न होता. मात्र त्यांचे बिंग फुटले आणि हा सगळा प्रकार समोर आलाा. शवविच्छेदन अहवालात सौरभ राजपूतच्या वेदनादायक मृत्यूचे सत्य समोर आलं आहे. अहवालानुसार सौरभला आधी बेशुद्ध करण्यात आले होते. यानंतर मुस्कान त्याच्या छातीवर बसली. साहिलने मुस्कानला त्याच्या छातीत चाकूने कसे भोसकायचे हे सांगितलं. पण मुस्कानला चाकू मारता आला नाही तेव्हा साहिलने तिचा हात धरून तिला पुन्हा समजावले. मग मुस्कानने त्याच्या छातीवर तीन वार केले.

सौरभच्या छातीवर चाकूने तीन वार केल्याचे शवविच्छेदनात स्पष्ट झालं आहे. सौरभचा गळा चिरून त्याचे शीर कापण्यात आले. त्यानंतर पाय कापून धड वेगळे करण्यात आले. डॉक्टरांच्या म्हणण्यांनुसार, सिमेंटमुळे मृतदेहही खराब झाला होता. आरोपींनी चाकूने जोरदार वार केले होते. सौरभच्या छातीत खोल खड्डा पडला होता. पाय मागे वळवले होते. नंतर मृतदेहावर अत्तरही ओतण्यात आले. डोके धडापासून वेगळे केले होते. हात मनगटापासून कापले होते आणि पायही धडापासून कापले होते.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला याला अटक केली आहे. मुस्कानने सौरभच्या हत्येसाठी चाकू, वस्तरा, ड्रग्ज, पॉलिथिन, ड्रम या वस्तू आधीच खरेदी केल्या होत्या. दोघांनी ३ मार्चच्या रात्री सौरभचा खून केला. ४ मार्च रोजी आरोपींनी मृतदेहाचे १५ तुकडे ड्रममध्ये भरले आणि त्यावर सिमेंट ओतलं. एका रात्रीत ते सिमेंट मृतदेहासह दगडाप्रमाणे झालं.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस