शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

धक्कादायक: AIचा असाही 'गैर'वापर! तुझ्या बहिणीचा अपघात झालाय, पैसे दे म्हणत ५८ हजार उकळले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 5:49 PM

आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या मदतीने एका व्यक्तीने एकाला चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

लखनौ : आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या मदतीने चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दिल्लीत न्यायाधीश म्हणून कार्यरत असलेल्या व्यक्तीच्या मेहुण्याला बहिणीच्या आवाजात फोन करून लाखो रूपयांचा गंडा घातला. अज्ञात आरोपीने तुझ्या बहिणीचा अपघात झाला असल्याचे सांगून दीड लाख रूपये खात्यात पाठवायला सांगितले. बहिणीचा अपघात झाल्यामुळे न्यायाधीशाच्या मेहुण्याने देखील क्षणाचाही विलंब न करता मागितलेली रक्कम पाठवली. पण, जेव्हा त्याने त्याच्या बहिणीला फोन केला तेव्हा सर्व प्रकार उघडकीस आला. मग लक्षात आले की, आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या मदतीने आपली फसवणूक झाली आहे. 

दरम्यान, याप्रकरणी लखनौमधील हुसैनगंज पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. राजस्थानात वास्तव्यात असलेले फूलचंद्र दिवाकर यांचा मेहुणा दिल्लीत न्यायाधीश आहे. फूलचंद्र यांच्या मोबाईलवर एक व्हॉटसप कॉल येतो अन् मोठी फसवणूक होते. लक्षणीय बाब म्हणजे पीडित व्यक्तीने फोन उचलताच त्याला त्याच्या बहिणीचा आवाज ऐकू आला. फूलचंद्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, बहिणीच्या आवाजात एका व्यक्तीने सांगितले की, मी कामानिमित्त लखनौला आले होते. पण वाटेत अपघात झाल्याने पैशांची गरज आहे. उपचारासाठी पैसे नाहीत. फोन करणाऱ्या व्यक्तीने त्याची आयडी दिली आणि पैसे पाठवण्यास सांगितले, ज्यामध्ये फूलचंद्र यांनी ५८ हजार रूपये ट्रान्सफर केले. थोड्या वेळानंतर जेव्हा पीडित फूलचंद्र यांनी त्यांच्या बहिणीला फोन करून प्रकृतीविषयी विचारणा केली तेव्हा त्यांना धक्का बसला. कारण 'मी घरी असून मला काहीच झाले नसल्याचे' त्यांच्या बहिणीने सांगितले. 

AIचा असाही 'गैर'वापर!सायबर तज्ज्ञांच्या मते, सायबर गुन्हेगार आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय तंत्रज्ञानाचा गैरवापर करत आहेत. हे सायबर गुन्हेगार आधी सोशल मीडियावर फेक अकाऊंट बनवून ते लोकांच्या जवळच्या मित्र आणि नातेवाईकांकडून पैसे मागायचे, पण आता या तंत्रज्ञानाचा वापर करून डीपफेक तयार करत आहेत. याकडे गांभीर्याने पाहायला हवे, हे तंत्रज्ञान खूप धोकादायक आहे. कारण आता यामध्ये तुमच्या ओळखीच्या व्यक्तींचे व्हिडीओ कॉलिंग आणि ऑडिओ करता येणार आहे. कॉलिंगमध्ये अगदी त्याच चेहऱ्याने आणि आवाजाने बोलून पैसे लुबाडले जाऊ शकतात. त्यामुळे लोकांनी सावध राहण्याची गरज आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशArtificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सcyber crimeसायबर क्राइम