डॉ. वसंत भोसले, लोकमत न्यूज नेटवर्कबंगळुरू : शोले चित्रपटाचे चित्रीकरण झालेल्या रामगडचा (रामनगरा) भाग असलेल्या बंगळुरू ग्रामीण लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. सलग दोन वेळा विजयी झालेले काँग्रेसचे उमेदवार डी. के. सुरेश यांना भाजपचे उमेदवार प्रतिष्ठित हृदयविकार तज्ज्ञ डॉ. सी. एन. मंजुनाथ यांच्याशी सामना करावा लागत आहे.
मोदी लाट असतानाही काँग्रेसचे सुरेश यांनी येथे सलग दोन वेळा विजय मिळवला असून, आता ते हॅट्ट्रिकच्या तयारीत आहेत. त्यांचे ज्येष्ठ बंधू डी. के. शिवकुमार उपमुख्यमंत्री आहेत. भाजपने माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे जावई डॉ. सी. एन. मंजुनाथ यांना उमेदवारी दिली आहे.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे - कनकपुरा आणि रामनगरा हा भाग वगळता ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष.- माडादी या मागास तालुक्याच्या विषय ऐरणीवर.- शहरी भागातील पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे आव्हान.- डी. के. सुरेश यांच्या जनसंपर्काच्या तुलनेत डॉ. मंजुनाथ यांना मर्यादा.- काँग्रेस पक्ष कर्नाटकात सत्तेत असल्याचा सुरेश यांना लाभ.
२०१९ मध्ये काय घडले? डी. के. सुरेश (काँग्रेस) विजयी ८,७८,२५८ अश्वथानारायण गौडा (भाजप) ६,७१,३८८