विशाखापट्टणम - आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणममध्ये दिवसाढवळया सर्वांसमक्ष एका महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईप्रमाणे इथे सुद्धा सर्वांच्या डोळयांसमोर बलात्कार झाला. पण कोणीही महिलेच्या मदतीसाठी पुढे आले नाही. लोकांनी फक्त बघ्याच्या भूमिकेत होते. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार एका ऑटोरिक्षा चालकाने या बलात्काराचे चित्रीकरण केले असून, त्यानेच पोलिसांना माहिती दिली.
बलात्कार प्रकरणातला आरोपी फक्त 20 वर्षांचा असून गंजी सिवा त्याचे नाव आहे. बलात्काराच्यावेळी तो दारुच्या नशेत होता. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. रविवारी दुपारी ही घटना घडली. हा बलात्कार घडत असताना चित्रीकरण करणा-या रिक्षा चालकाने पोलिसांकडे ही व्हिडीओ क्लिप दिली. रेल्वे स्टेशनजवळच्या फुटपाथवर झाडाच्या बाजूला पीडित महिला बसली होती. शहरातील हा वर्दळीचा भाग आहे. दुपारच्या समयी आरोपी गंजी सिवा तिथे आला व त्याने महिलेवर जबरदस्ती सुरु केली.
ही घटना घडत असताना लोक तिथून चालत होते पण कोणीही मदतीसाठी पुढे आले नाही. त्या ऑटो चालकाने व्हिडीओ काढण्याऐवजी महिलेची मदत करायला हवी होती असे काहीजणांचे मत होते.
मुंबईत बेशुद्घ होईपर्यंत तरुणीला मारहाण मुंबईतही छेडछाडीचा जाब विचारला म्हणून अल्पवयीन मुलीला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केल्याची घटना घडली कुर्ला नेहरुनगर येथे मंगळवारी रात्री हा प्रकार घडला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी सर्वांसमक्ष तरुणीला मारहाण करत होता. अनेकजण ही घटना पाहत होते. पण कोणीही मध्ये हस्तक्षेप करुन या तरुणीला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही.
ही तरुणी बेशुद्ध होऊन खाली कोसळेपर्यंत तिला मारहाण करण्यात आली. मंगळवारी संध्याकाळी ही तरुणी नेहमीप्रमाणे तिच्या मैत्रिणीसोबत शिलाईच्या शिकवणी वर्गाला जात होती. त्यावेळी त्याच इमारतीत राहणा-या इमरान शाहीद शेखने तिला पाहून एक कमेंट केली. तरुणीला त्याचे शब्द ऐकून राग आला तिले त्याला जाब विचारला. त्यावर चिडलेल्या इमरानने तिच्या कानाखाली मारली तसेच तिला बुक्के मारले. तरुणी बेशुद्ध होऊन खाली कोसळेपर्यंत इमरानने तिला मारहाण केली.
विक्रोळीत विवाहित महिलेवर चाकूहल्ला विक्रोळीमध्ये एका विवाहित महिलेवर चाकू हल्ल्याची घटना घडली आहे. पीडित महिलेच्या ऑफीसमध्ये जाऊन तिच्यावर चाकू हल्ला केला. पीडित महिला विक्रोळीच्या तिच्या ऑफीसमध्ये असताना आरोपी सावीर हसन मोहम्मद खान तिथे आला व त्याने वाद घालायला सुरुवात केली.