मुंबई : भारतात ई र्कामर्स बाजारपेठ तब्बल ६७ टक्क्यांनी वाढून, ती ३८ अब्ज डॉलर्सवर जाणे अपेक्षित असतानाच दागिने व जवाहिऱ्यांची आॅनलाइन खरेदीही २00 लक्ष डॉलर्सवर गेली आहे. एकूणच इॅ कॉमर्स बाजारपेठेत जेम्स आणि ज्वेलरीचा वाटा वाढण्याची शक्यता लक्षात घेत बिझनेस टू कन्झयुमर (बीटूसी) आणि बिझनेस टू बिझनेस (बीटूबी) पोर्टल दाखल झाले आहे. चोवीस तास सुरू राहणाऱ्या या व्हर्च्युअल स्टोअर्समुळे किफायतशीर किमतीला दागिने मिळू शकतील, असा दावा केला जात आहे.या पोर्टलमुळे ब्रोकरेज हा प्रकार बंद होईल, अनेक अतिरिक्त शुल्क बंद होतील आणि विश्वसनीय प्रमाणपत्रे व घरपोच सेवा हा फायदा गिऱ्याईकांना मिळेल, दुसरीकडे सुवर्णकार आणि त्यांच्याकडील कारागिर यांनाही मोठा व्यवसाय मिळू शकेल, असे ज्युवेलईमार्टचे सीईओ आदिश शाह यांनी सांगितले. ज्युवेलईमार्टच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल, असा दावा करून ते म्हणाले की आतापर्यंत दागिन्यांच्या कमी श्रेणी वा किंमतीमध्ये चीन आपल्यापुढे होता. मात्र या पोर्टरलच्या माध्यमातून भारत दहिल्या क्रमांकावर जाईल, अशी खात्री आहे. मेक इन इंडियाच्या दृश्टीने हे आमचे छोटेसे योगदान आहे.त्यांनी म्हटले की, आपल्या कंपनीबाबत शाह यांनी म्हटले की, आपल्या पहिल्या परिचालन वर्षात म्हणजेच २0१६-१७ या वर्षात कंपनी १00 कोटी रुपयांचा व्यवसाय करील, अशी आम्हाला अपेक्षा आहे. कंपनीच्या दुसऱ्या वर्षात त्यात ५0 टक्क्यांची वाढ होईल, तसेच तिसऱ्या वर्षात व्यवसायाचा आकडा २00 ते ३00 कोटी रुपयांवर जाईल. आॅनलाईन बाजाराला वावजागतिक आॅनलाईन दागिने बाजार १0 अब्ज डॉलरचा आहे. तीन वर्षांत ८ अब्ज डॉलरची भर पडून तो १८ अब्ज डॉलरवर जाईल. भारतातील ई-कॉमर्स व्यवहारांची गती पाहता २0 टक्के हिस्सा भारताचा राहील, असा अंदाज आहे. आॅनलाईन दागिने बाजाराला खूप वाव आहे.
चोविस तास करता येणार दागिन्यांची खरेदी
By admin | Published: July 09, 2016 2:47 AM