देशभरात काही अटींवर अन्य दुकाने उघडणार; दारुच्या दुकानांबाबत घेतला हा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 09:12 AM2020-04-25T09:12:51+5:302020-04-25T13:05:30+5:30
CoronaVirus Lockdown अन्य दुकानांना परवानगी काही अटींवर मिळाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. गृह मंत्रालयाने तसा आदेश काढला असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. य़ा दुकानांमध्ये केवळ ५० टक्केच कामगार काम करू शकणार आहेत. कोरोनामुळे प्रभावित असलेले भाग या सूटमधून वगळण्यात आले आहेत.
नवी दिल्ली : लॉकडाऊनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवाच सुरु राहणार होत्या. मात्र, आजपासून अन्य दुकाने काही अटींवर उघडता येणार आहेत. त्यातच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दारुची दुकाने सुरु करण्याची अटींवर शक्यता वर्तविली होती. याबाबत केंद्राने वेगळा निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकारने २० एप्रिलपासून काही कंपन्यांना कमी स्टाफद्वारे काम करण्याची संमती दिली होती. तसेच दुरुस्ती करणाऱ्या लोकांनाही काम करण्याची परवानगी मिळाली होती. आता अन्य दुकानांना परवानगी काही अटींवर मिळाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. गृह मंत्रालयाने तसा आदेश काढला असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. य़ा दुकानांमध्ये केवळ ५० टक्केच कामगार काम करू शकणार आहेत.
या आदेशामध्ये शॉपिंग मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्सना परवानगी देण्यात आलेली नाही. देशात उद्यापासून काही व्यापारी व्यवहार होण्यास सुरुवात होऊ शकते. निवासी कॉलनीच्या जवळील दुकाने आणि स्टँड अलोन दुकाने आजपासून उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासाठी ही दुकाने नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रामध्ये असली पाहिजेत. याशिवाय गृह मंत्रालयलाने काही अटीही लागू केल्या आहेत.
दारुच्या दुकानांचे काय?
या आदेशातून दारुच्या दुकानांना वगळण्यात आले आहे. वाईन, बिअर शॉप जरी शॉप आणि एस्टॅब्लिशमेंट कायद्यामध्ये येत असले तरीही केंद्र सरकारने या दुकानांना वेगळ्या कॅटेगरीमध्ये ठेवले आहे. यामुळे ही दुकाने लॉकडाऊनपर्यंत बंदच राहणार आहेत.
Delhi: Hardware shops in Laxmi Nagar open after about a month into #CoronaLockdown. All shops registered under Shops&Establishment Act of respective States/UTs, incl shops in residential complexes, neighborhood&standalone shops have now been exempted from lockdown restrictions. pic.twitter.com/w8CLjREB2l
— ANI (@ANI) April 25, 2020
हॉटस्पॉट आणि कंटेनमेंट झोन वगळले
कोरोनामुळे प्रभावित असलेले भाग या सूटमधून वगळण्यात आले आहेत. हॉटस्पॉट आणि कंटेनमेंट झोन मधील दुकाने बंदच राहणार आहेत. तसेच शहरी सीमेच्या बाहेर येणाऱ्या दुकानांनाच परवानगी आहे. तसेच बाजार, कपड्यांची दालने जिथे ग्राहक स्वत: फिरतात ती किंवा तशा प्रकारची इतर दुकाने बंद राहणार आहेत.
आणखी वाचा...
CoronaVirus चीनचा कांगावा! म्हणे "आमचे टेस्टिंग किट उत्तम, भारतीयांनाच वापरायचे ज्ञान नाही"
मोठा दिलासा! आजपासून सर्व दुकाने उघडणार; शॉपिंग मॉल, कॉम्प्लेक्स बंदच राहणार
किम जोंग उन अत्यवस्थ नाहीत; तरीही उपचारासाठी चीनने पाठविली डॉक्टरांची फौज
आजचे राशीभविष्य - 25 एप्रिल 2020
सावधान! आता पीएफ अॅडव्हान्स काढाल तर 10 वर्षांनी पस्तावाल