थोडक्यात...
By admin | Published: February 07, 2016 10:46 PM
संघर्ष अपंग कल्याण संस्थेची बैठक
संघर्ष अपंग कल्याण संस्थेची बैठकजळगाव : संघर्ष अपंग कल्याण संस्थेची बैठक डॉ. शामाप्रसाद मुखर्जी उद्यानात झाली. यावेळी अपंगाच्या विविध योजनांसदर्भात ६० बांधवांचे अर्ज संस्थेतर्फे भरुन घेतले. यावेळी बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या. केंद्र शासनाची मुद्रा बँक कर्ज योजना कागदावरच आहे. बँक अधिकारी मदत करत नसल्याने जिल्हाधिकारीयांनी यासंदर्भात आढाव घेण्याची मागणी केली. यावेळी मुकेश सोनवणे, संगिता प्रजापत, आशा पाटील, किशोर नेवे, मुकुंद गोसावी, योगेश जाधव, राजेंद्र वाणी उपस्थित होते.