छावा क्रांतिवीर संघटनेतर्फे अधिवेशननाशिक : छत्रपती संभाजी राजे जयंती येत्या गुरुवारी (दि.१४) असून, यानिमित्त छावा क्रांतिवीर संघटनेची राज्यव्यापी अधिवेशनाने मुहूर्तमेढ रोवली जात आहे. दुपारी २ वाजता तीन मंदिर मैदान, ज्ञानेश्वरनगर, जेलरोड येथे हा महामेळावा होईल.तिडके कॉलनीत कामगार मेळावानाशिक : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे कामगार दिनानिमित्त कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहर सरचिटणीस सोपान कडलग उपस्थित होते. यावेळी बचत गटातील महिलांचा सत्कार केला. विश्वास बॅँकेतर्फे कार्यशाळेचे आयोजननाशिक : विश्वास को-ऑप. बॅँक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी ॲण्ड रिसर्च इन्स्टट्यिूट यांच्या संयुक्त विद्यमाने ओरिगामी व मैत्री गणिताशी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (दि.१६) सकाळी १० ते सायंकाळी ५ यावेळेत विश्वास लॉन्स येथे कार्यशाळा होईल. प्लास्टिक पिशव्या बंदीचा उपक्रमनाशिक : महापालिका, भारत स्काऊट- गाइड, ऊर्जा प्रतिष्ठान, जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्याच्या सहभागातून प्लास्टिकबंदी उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
संक्षिप्त बातम्यांचा पा
By admin | Published: May 15, 2015 12:12 AM