शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
2
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
3
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
4
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
5
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
6
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
7
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
8
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
9
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
10
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
11
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
12
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
13
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
14
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
15
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
16
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
17
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
18
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
19
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
20
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा

गुजरातमध्ये प्राथमिक शिक्षकांचा तुटवडा

By admin | Published: March 22, 2016 3:20 AM

गुजरातमध्ये शिक्षकांअभावी शैक्षणिक स्तर घसरल्याचा आरोप काँग्रेसने केला असतानाच राज्यातील शासकीय प्राथमिक शाळांमध्ये १३ हजारावर शिक्षकांची कमतरता असल्याची कबुली राज्य सरकारने दिली आहे.

अहमदाबाद : गुजरातमध्ये शिक्षकांअभावी शैक्षणिक स्तर घसरल्याचा आरोप काँग्रेसने केला असतानाच राज्यातील शासकीय प्राथमिक शाळांमध्ये १३ हजारावर शिक्षकांची कमतरता असल्याची कबुली राज्य सरकारने दिली आहे.गुजरात विधानसभेत अलिकडेच सरकारने सादर केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात शिक्षकांची १,८०,६०१ पदे मंजूर असताना केवळ १,६७,४६१ कार्यरत आहेत. याचाच अर्थ शिक्षकांची १३,१४० पदे अजूनही रिक्त आहेत. जिल्हानिहाय आकडे बघितल्यास असे लक्षात येते की कच्छ आणि बनासकांठा हे दुर्गम जिल्हे तसेच पंचमहल व दाहोद या आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये शिक्षकांचा सर्वाधिक तुटवडा आहे. कच्छमध्ये २,७२४, बनासकांठात १,७४१, पंचमहल ९३५ आणि दाहोदमध्ये ९१२ पदे रिक्त आहेत. उच्च प्राथमिक शाळांमध्ये (सहावी ते आठवी) गणित आणि विज्ञान हे विषय शिकविणारे २,४०० शिक्षक नाहीत. या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की शासनाद्वारे संचालित उच्च प्राथमिक शाळांमध्ये गणित आणि विज्ञान विषय शिकविणाऱ्या २,४१३ शिक्षकांची भरती शासनाला करावी लागणार आहे. बनासकांठात गणित आणि विज्ञान विषयाचे ४०४ शिक्षक कमी आहेत. तर पंचमहलमध्ये ३८२, अहमदाबादेत २३० आणि दाहोदमध्ये २०३ शिक्षक हवे आहेत. (वृत्तसंस्था)