ंकारची मोटारसायकलला धडक; दोघेजण जखमी सिंदखेडफाटा येथील घटना : कारचालकाविरुद्ध गुन्हा
By admin | Published: October 03, 2015 2:31 AM
कुरूम : मूर्तिजापूर येथून बडनेराकडे जाणार्या मोटारसायकलला अमरावतीकडून अकोल्याकडे भरधाव जाणार्या कारने २ ऑक्टोबरच्या सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास धडक दिल्याने मोटारसायकलवरील दोघेजण जखमी झाले. त्यापैकी एका गंभीर जखमीस उपचारासाठी अकोल्यात सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आले.
कुरूम : मूर्तिजापूर येथून बडनेराकडे जाणार्या मोटारसायकलला अमरावतीकडून अकोल्याकडे भरधाव जाणार्या कारने २ ऑक्टोबरच्या सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास धडक दिल्याने मोटारसायकलवरील दोघेजण जखमी झाले. त्यापैकी एका गंभीर जखमीस उपचारासाठी अकोल्यात सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आले.अमरावती जिल्ातील मालखेड येथील रहिवासी असलेले आशिष भीमराव मोरे (२३) व त्याचा मित्र अंकुश पुरुषोत्तम गवळी (२३) हे दोघे शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता एम.एच.२७ बी.जे.६०२५ क्रमांकाच्या मोटारसायकलने मूर्तिजापूरवरून बडनेराकडे जात होते. याचवेळी एम.एच.३० ए.एफ.५८२७ क्रमांकाची मारोती सुझुकी अल्टो कार भरधाव अमरावतीकडून अकोल्याकडे जात होती. सदर कारने सिंदखेड फाट्यानजीक मोटारसायकलला जबर धडक मारली. या अपघातात मोटारसायकलवरील अंकुश गवळी व आशिष मोरे हे जखमी झाले. त्यांना तातडीने मूर्तिजापूरला आणण्यात आले. तेथे प्रथमोपचार करून गंभीर जखमी असलेल्या अंकुशला पुढील उपचारासाठी अकोल्यास पाठविले. आशिषवर मूर्तिजापुरात उपचार सुरू आहेत. या घटनेबाबत आशिष मोरेच्या तक्रारीवरून मूर्तिजापूर पोलिसांनी एम.एच.३० ए.एफ.५८२७च्या अज्ञात चालकाविरुद्ध भा.दं.वि.चे २७९, ३३७, ३३८, ४२७ व मोटारवाहन कायद्याच्या १८४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मानाचे ठाणेदार अशोक वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल नरेंद्र पद्मणे हे करीत आहेत. (वार्ताहर)००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००