शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
लग्नाच्या सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
3
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
4
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
5
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
6
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
7
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
8
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
10
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
11
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
12
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
13
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
14
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
15
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
16
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
17
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
18
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
19
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
20
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत

"अफझल गुरुला पुष्पहार घातला असता का?", ओमर अब्दुल्ला यांच्या वक्तव्यावर राजनाथ सिंह संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2024 16:38 IST

Rajnath Singh : रामबनमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू-काश्मीरमध्ये भाजपचे सरकार स्थापन करण्याचे आवाहन केले.

Rajnath Singh On Omar Abdullah Remark: जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तशी राजकीय नेत्यांची एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही सुरू झाल्या आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी नॅशनल कॉन्फरन्सवर निशाणा साधत दहशतवाद्यांबद्दल सहानुभूती असल्याचे सांगितले. तसेच, जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आणि संसद हल्ल्याचा मास्टरमाईंड अफजल गुरू याच्याबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल ओमर अब्दुल्ला यांना सवाल विचारला.

रामबनमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू-काश्मीरमध्ये भाजपचे सरकार स्थापन करण्याचे आवाहन केले. यावेळी अफजल गुरूला पुष्पहार घालायला हवा होता का? असा सवाल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केला. ते म्हणाले, "नॅशनल कॉन्फरन्सने दहशतवाद्यांबद्दल सहानुभूती दाखवली आहे. मी अलीकडेच ओमर अब्दुल्ला यांना असे म्हणताना ऐकले आहे की, अफजल गुरूला फाशी द्यायला नको होती."

पुढे राजनाथ सिंह म्हणाले, "नॅशनल कॉन्फरन्स कलम ३७० पुन्हा लागू करण्याविषयी बोलत आहे, परंतु गेल्या पाच वर्षांत ४० हजार नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये आमचे सरकार आल्यानंतर आम्ही विकास कामं करू, जेणेकरून पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील लोकांना भारताचा भाग व्हायला आवडेल. पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) जनतेला पाकिस्तान परदेशी समजतो, तर पीओके भारताचा भाग आहे. पाकिस्तानचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणाले आहेत की, पीओके ही परदेशी भूमी आहे. पीओकेच्या लोकांना मी सांगू इच्छितो की, भारत त्यांना आपला मानतो."

काय म्हणाले ओमर अब्दुल्ला?दरम्यान, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी शुक्रवारी (८ सप्टेंबर) अफजल गुरूवर वक्तव्य करून राजकीय वाद निर्माण केला होता. संसद हल्ल्यातील दोषी अफझल गुरूला फाशी देऊन कोणताही हेतू साध्य झाला नाही, असे त्यांनी म्हटले होते. ओमर अब्दुल्ला म्हणाले, "जम्मू आणि काश्मीर सरकारचा अफझल गुरूच्या फाशीशी काहीही संबंध नाही. जर असता तर राज्य सरकारच्या परवानगीने असे केले असते आणि जम्मू-काश्मीर सरकारने त्याला मान्यता दिली नसती."

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहJammu Kashmirजम्मू-काश्मीरBJPभाजपाOmar Abdullahउमर अब्दुल्ला