नवी दिल्लीः औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेवरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी नाव न घेता मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. औरंगाबाद तालुक्यातील सटाणा शिवारात रेल्वे रुळावर थकून झोपलेले १६ मजूर मालवाहू रेल्वेखाली चिरडले गेल्यानं राज्यात एकच खळबळ उडाली आहे. सर्व मजूर मध्य प्रदेश येथील असून, ते जालना येथे लॉकडाऊनमध्ये अडकले होते. घराच्या ओढीने सर्व मजूर पायी रेल्वे रुळाच्या मार्गे निघाले होते. सटाना परिसरात ते रुळावर झोपले असताना मालगाडीने त्यांना चिरडले. यात १६ जण ठार, तर २ मजूर जखमी झाले. या अपघाताबाबत राहुल गांधींनी दुःख व्यक्त केलं आहे. रेल्वे अपघातात मजूर भाऊ-बहिणींच्या मृत्यूच्या बातमीनं मी दुःखी आहे. राष्ट्र उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कामगारांबरोबर होत असलेल्या व्यवहारावर आपल्याला लाज वाटली पाहिजे. मृत मजुरांच्या कुटुंबीयांप्रति मी सहवेदना व्यक्त करतो. तसेच जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करतो, असंही राहुल गांधी म्हणाले आहेत. तसेच या प्रकरणाची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दखल घेतली असून, रेल्वे मंत्र्यांशी चर्चा केली आहे. तसेच या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असल्याचंही मोदी म्हणाले आहेत. आवश्यक मदत केली जाईल, असंही आश्वासन मोदींनी दिलं आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेतून बचावलेल्या मजुराने सांगितलं नेमकं काय घडलं!
लॉकडाऊनची भीषणता! औरंगाबादजवळ रेल्वे रुळावर झोपलेले १६ मजूर चिरडून ठार
'गावी जाऊ इच्छिणाऱ्या, शहरात अडकलेल्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी मोफत होणार'
Coronavirus: आता पोस्टानं होणार कोरोना टेस्टिंग किट्सची डिलिव्हरी; ICMRनं केला करार
Coronavirus: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची भीती, खासगी नोकर निघाला संक्रमित