शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
4
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
5
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
6
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
7
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
8
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
9
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
10
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
11
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
12
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
13
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
14
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
15
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
16
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
17
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
18
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
19
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
20
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!

सचिवपदावर पोहोचलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांनाही आरक्षण असावे काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 5:03 AM

एखाद्या जातीला ५० वर्षांहून अधिक काळपर्यंत मागासवर्गीय म्हणून सवलती मिळत असतील, त्याआधारे एखादी व्यक्ती वरिष्ठ पदापर्यंत पोहोचली असेल, तर तिला व तिच्या कुटुंबीयांना वा अशा वर्गाला क्रिमिलेअर समजू नये का

नवी दिल्ली : एखादी मागासवर्गीय व्यक्ती आरक्षणामुळे आयएएस झाली व पदोन्नतीद्वारे ती सचिवपदापर्यंत पोहोचली, तर त्याच्या नातवाला वा पणतुला आरक्षणाद्वारे नोकरी देणे कितपत योग्य आहे, त्याला केवळ मागासवर्गीय म्हणून नोकरीसाठी गृहित धरावे काय, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला केला आहे. अनुसूचित जाती व जमातीच्या लोकांना नोकऱ्यांमध्ये पदोन्नती देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिकेची सुनावणी सुरू असताना न्यायालयाने हा सवाल केला.

सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला केला सवाल

एखाद्या जातीला ५० वर्षांहून अधिक काळपर्यंत मागासवर्गीय म्हणून सवलती मिळत असतील, त्याआधारे एखादी व्यक्ती वरिष्ठ पदापर्यंत पोहोचली असेल, तर तिला व तिच्या कुटुंबीयांना वा अशा वर्गाला क्रिमिलेअर समजू नये का, अशा व्यक्तींच्या पुढील पिढ्यांच्या रोजगाराबाबत आरक्षण असावे काय, असा सवालही सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या खंडपीठाने केला. आरक्षण देण्यामागील कल्पनाच मुळी सामाजिकदृष्ट्या मागास असलेल्या समाजघटकांना मुख्य प्रवाहात आणणे, त्यासाठी मदत करणे हा हेतू होता. सामाजिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम समाजघटकांसाठी आरक्षण देण्याचा हेतू कधीच नव्हता, असेही न्यायालयाने नमूद केले. या खंडपीठात न्या. कुरियन जोसेफ, न्या. इंदू मल्होत्रा व न्या. एस. के. कौल यांचा समावेश आहे. अनुसूचित जाती व जमातींना सरकारी नोकºयांमध्ये आरक्षण देताना क्रिमीलेअरचे तत्त्व लागू करता येणार नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने २००६ साली एम. नागराज प्रकरणात दिला होता.या निर्णयाचा पुनर्विचार करावा आणि पदोन्नतीमध्ये आरक्षण कायम असावे, अशी विनंती केंद्र सरकारतर्फे अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी केली.आजही उपेक्षानागराज प्रकरणामुळे अनुसूचित जाती व जमातींना आजही उपेक्षा सहन करावी लागत आहे. नागराज प्रकरणातील निकालामुळे या जाती-जमातींना पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळेनासे झाले आहे. त्यामुळे या वर्गाला क्रिमीलेअरचे तत्व लागता कामा नये.ते केवळ ओबीसींसाठीच असून, तेवढेच मर्यादित राहावे, असाही युक्तिवाद केंद्र सरकारतर्फे करण्यात आला. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयreservationआरक्षणCourtन्यायालय