मनाली - सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण आणि बॉलिवूडमधील ड्रग्स रॅकेट यावरून महाराष्ट्र सरकार आणि शिवसेनेवर बेछूट टीका केल्यानंतर अभिनेत्री कंगना राणौत पुन्हा एकदा हिमाचल प्रदेशमध्ये परतली आहे. दरम्यान, घरी परतल्यानंतर कंगनाने बॉलिवूडला पुन्हा एकदा टीकेचे लक्ष्य केले आहे. हा शो बिझनेस विषारी आहे अशी टीका तिने केली आहे.आपल्या ट्विटमध्ये कंगना म्हणाली की, शो बिझनेस पूर्णपणे विषारी आहे. प्रकाशाचा झगमगाट आणि कॅमेऱ्याचे हे जग कुणाचेही जीवन चालवण्याचे आणि आभासी वास्तवावर विश्वास ठेवायला देते, याची जगाला जाणीव करूव देते. या आभासीपणाची जाणीव होण्यासाठा अध्यात्मिकदृष्ट्या भक्कम असणे आवश्यक आहे.
गेल्या काही दिवसांपासून कंगना राणौत आणि शिवसेनेमध्ये जोरदार आरोपप्रत्यारोप होत आहेत. सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून कंगना आणि शिवसेनेमध्ये सुरू झालेले शाब्दिक युद्धा टोकाला पोहोचले होते. तसेच या दरम्यान मुंबईला पीओकेची उपमा देणाऱ्या कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर मुंबई महानगरपालिकेने बुलडोजर चालवला होता.काही लोकांमुळे चित्रपटसृष्टी दोषी ठरत नाही चित्रपटसृष्टीही अमली पदार्थांवर अवलंबून आहे, असे वक्तव्य संसदेत सोमवारी केलेले भाजपचे रवी किशन यांच्यावर समाजवादी पक्षाच्या राज्यसभा सदस्य व ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी टीका केली. रवी किशन हे अभिनेते व उत्तर प्रदेशातून लोकसभेवर निवडून गेले आहेत. चित्रपटसृष्टीला समाजमाध्यमांतून फटकारले जात आहे, कारण सरकारचा या मनोरंजन क्षेत्राला पाठिंबा नाही, असे सांगून जया बच्चन म्हणाल्या, काही मोजक्या लोकांमुळे तुम्ही संपूर्ण चित्रपटसृष्टीला कलंक लावू शकत नाहीत. रवी किशन यांचे वक्तव्य हे सध्या देशाची बिघडलेली आर्थिक परिस्थिती आणि बेरोजगारी या विषयावरून जनतेचे लक्ष दूर करण्यासाठी आहे, असा आरोपही बच्चन यांंनी केला."एके दिवशी अभिषेक फासावर लटकला असता तर..." बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत सध्या सगळीकडे चर्चेचा विषय आहे. सोशल मीडियावरुन ती बिनधास्तपणे आपली मुद्दे मांडत असते. आता तिने केलेलं ट्विट पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. कंगना राणौतनंबॉलिवूड महानायक बिग बी यांची पत्नी खासदार जया बच्चन यांच्या टीकेला आक्रमक उत्तर दिलं आहे. राज्यसभेत मंगळवारी जया बच्चन यांनी नाव न घेता कंगनावर निशाणा साधला होता.याबाबत कंगनानं ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ''जया जी, तुम्ही तेव्हाही असंच बोलला असतात का जर माझ्या जागी तुमची मुलगी श्वेताला टीएनेजमध्ये मारहाण झाली असती, ड्रग्स दिलं गेले असतं आणि छेडछाड केली असती? तुम्ही त्यावेळीही हे बोलला असतात का जेव्हा अभिषेक बच्चनला त्रास दिला जात असता आणि एके दिवशी तो फासावर लटकलेला दिसला असता? आमच्याबद्दलही सहानुभूती दाखवा.''
इतर महत्त्वाच्या बातम्या
ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले
शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी