नवी दिल्ली : भागवत यांच्या आरक्षणावरील विधानावर राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. रा.स्व. संघ आणि भाजपाने आरक्षण बंद करण्यासाठी कितीही सुनियोजित प्रयत्न केला तरी देशातील ८० टक्के दलित, आदिवासी आणि ओबीसी त्याला चोख प्रत्युत्तर देतील, असे लालूप्रसाद यादव यांनी टिष्ट्वटरवर म्हटले आहे.‘ते आरक्षण बंद करण्याची भाषा करीत आहेत. आम्ही लोकसंख्येच्या आधारावर आरक्षणाची टक्केवारी वाढवू. हिंमत असेल तर त्यांनी आरक्षण बंद करूनच दाखवावे. कुणाची किती ताकद आहे हे दिसेल,’ असे आव्हानही त्यांनी दिले. आपल्या गुरूच्या (भागवत) सांगण्यावरून आरक्षण बंद करणार काय, हे तथाकथित चहावाला आणि नुकतेच मागासवर्गीय बनलेले नरेंद्र मोदी यांनी सांगावे, असेही लालूप्रसाद म्हणाले. ही धोक्याची घंटा-संजदबिहारमधील सत्तारूढ संयुक्त जनता दलाने भागवत यांच्या आरक्षणाबाबतच्या विधानाचा निषेध केला आहे. भागवत यांचे हे विधान म्हणजे आरक्षणाच्या श्रेणीत मोडणाऱ्या समाजासाठी धोक्याची घंटा आहे, असे मत संजदचे ज्येष्ठ नेते खासदार अली अनवर अंसारी यांनी एका निवेदनात म्हटले आहे. सर्वमान्य मुद्दा-रालोसपाराज्यघटनेमध्ये आरक्षणाचा अधिकार दिला असल्याने हा आता भारतातील सर्वमान्य मुद्दा आहे. त्यामुळे याबाबत आम्ही काहीही बोलणार नाही, असे रालोआचा घटक पक्ष असलेल्या रालोसपाचे सरचिटणीस शिवराजसिंग यांनी म्हटले आहे.आरक्षणाच्या प्रासंगिकतेवर काँग्रेसच्या तिवारींचे प्रश्नचिन्हआरक्षणाची गरजच असेल तर ते जातीवर आधारित न राहता आर्थिक परिस्थितीवर आधारित असायला पाहिजे, असे मत व्यक्त करून काँग्रेसचे नेते आणि माजी सूचना व प्रसारण मंत्री मनीष तिवारी यांनी आरक्षण धोरणाच्या प्रासंगिकतेवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. आरक्षणाबाबतचे आपले हे मत जुनेच आहे आणि १५ दिवसांपूर्वीच आपण एक लेख लिहून हे मत व्यक्त केले आहे. २१ व्या शतकात आरक्षणाची प्रासंगिकता काय आहे? आरक्षण द्यायचेच असेल तर ते जातीच्या आधारावर न देता आर्थिक परिस्थितीच्या आधारावर दिले पाहिजे.
आरक्षण बंद करूनच दाखवा - लालूप्रसाद यादव
By admin | Published: September 22, 2015 2:03 AM